२५-मार्च-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, March 25, 2023, 10:13:11 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२५.०३.२०२३-शनिवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                    "२५-मार्च-दिनविशेष"
                                   --------------------

-: दिनविशेष :-
२५ मार्च
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२०१३
मणिपूर उच्‍च न्यायालयाची स्थापना
२०१३
मेघालय उच्‍च न्यायालयाची स्थापना
२०००
१७ वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ़्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे.
१९९७
जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे २७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९२९
लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले.
१८९८
शिवरामपंत परांजपे यांचे 'काळ' हे साप्ताहिक सुरू झाले.
१६५५
क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनिच्या सर्वात मोठया उपग्रहाचा (टायटन) शोध लावला.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९५६
मुकूल शिवपुत्र – ग्वाल्हेर घराण्याचे गायक
१९४७
रेजिनाल्ड केनेथ ड्वाईट तथा सर एल्टन हर्क्युलस जॉन – इंग्लिश संगीतकार व गायक
१९३३
वसंत रणछोडदास गोवारीकर – भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ, इस्रोचे संचालक, पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार (१९९१-१९९३), पद्मश्री (१९८४), पद्मभूषण (२००८), फाय फाउंडेशन पारितोषिक विजेते
(मृत्यू: २ जानेवारी २०१५)
१९३२
वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे – लेखक व कथाकथनकार
(मृत्यू: २६ जून २००१)
१९२३
पहिले महायुद्ध : दि. वि. गोखले यांनी लिहिलेले पुस्तक
दिनकर विनायक तथा 'बंडोपंत' गोखले – सावरकरप्रेमी मराठी लेखक व पत्रकार, युद्धशास्त्राचे अभ्यासक
(मृत्यू: २० ऑक्टोबर १९९६)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
१९९३
मधुकर केचे – साहित्यिक
(जन्म: १७ जानेवारी १९३२)
१९९१
वामनराव सडोलीकर – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक
(जन्म: १६ सप्टेंबर १९०७)
१९७५
फैजल – सौदी अरेबियाचा राजा
(जन्म: ? एप्रिल १९०६)
१९४०
'उपन्यास सम्राट' रजनीकांत बर्दोलोई – आसामी कादंबरीकार, आसामी ऐतिहासिक कादंबरीचे जनक
(जन्म: ११ डिसेंबर १८६७)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.03.2023-शनिवार.
=========================================