कविता-माझ्या हाती मद्याचा प्याला आहे, हा छलकता जाम तुझ्या नावाचा आहे !

Started by Atul Kaviraje, March 27, 2023, 11:55:25 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, प्रियेला मद्याची उपमा देणारी कविता-गीत ऐकवितो. "छलकाएं जाम आइये आपकी आँखों के नाम, होंठों के नाम"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा,व मला प्रोत्साहित करा. मार्च महिन्याची ही सोमवार-सकाळ आपणास आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे- (छलकाएं जाम आइये आपकी आँखों के नाम, होंठों के नाम)
--------------------------------------------------------------------

      "माझ्या हाती मद्याचा प्याला🍷आहे, हा छलकता जाम🥂तुझ्या नावाचा आहे !"
     -------------------------------------------------------------------

माझ्या हाती मद्याचा प्याला आहे, 🍷
हा छलकता जाम तुझ्या नावाचा आहे ! 🥂
हा जाम मी उंचावत आहे, पीत आहे,
तुझ्या डोळ्यांना, ओठांना स्मरून मी सेवीत आहे !

माझ्या हाती मद्याचा प्याला आहे, 🍷
हा छलकता जाम तुझ्या नावाचा आहे ! 🥂
घोटाघोटात मला तो अधिक तरुण करीत आहे,
प्रत्येक घोटात मला तुझीच छबी दिसत आहे ! 🖼

रूप असे, फ़ुलाफ़ुलात तू जडली आहेस 🍀🌺
रूप असे, नख-शिखांत तू घडली आहेस
चमेलीच्या सुरभीत मुरलेला तुझा देह,
तुझं अंग अंग सुगंधी करीत आहे.

जणू तुझ्या ओठांना स्पर्श करून
हा जाम स्वतःच मदहोश होत आहे 🍾
माझी हालत काय मग विचारता,
दोन्ही पिऊन मी बेहोष व्हायचाच बाकी आहे.

एखाद्या शाखेसमान तुझा देह हिलोरे घेतोय
तुझ्या कृष्ण केश-संभार कसा मुक्त लहरतोय
पाहणारा कसा नाही होणार मदहोश,
तुझ्या या कातिल अदेवर मी प्याला तोंडी लावतोय.

तुझंच नाव या मैफिलीत गुंजत आहे
तुझ्याच नावावर हे प्याले खनकत आहेत
सर्व आज जणू मस्त नशेत मग्न आहेत,
त्यांना पिण्यास हे जामच कमी पडताहेत.

जाम पुन्हा पुन्हा भरले जाताहेत 🍷
प्याले पुनः एकमेकांवर आपटताहेत 🥂
सर्वानी प्रणच केलाय जणू पिण्याचा,
अन भरपूर पिऊन नशेत झुमण्याचा.

आता या मैफिलीत कुणीच अनोळखी नाहीय
आज या मैफिलीत कुणीच अजनबी नाहीय
तू सर्वांचंच काम तमाम करून टाकलंस,
पिऊन सारेच तर्र झालेत, कुणीच शुद्धीत नाहीय.   

भरपूर पिऊन सारे कसे भान विसरलेत
कुणालाही मिठीत घेऊन बेभान नृत्य करताहेत 💃
ताळतंत्रच नाही उरलंय कोणालाही, कसंही,
हसताहेत, बडबडताहेत, मध्येच वादही घालताहेत.

पण मी सर्वांत वेगळा आहे
मी स्वतःच्या होशमध्ये आहे
सर जग पिऊन बेहोष आहे,
पण मी हा जाम पिऊन मदहोश आहे. 🍷🍾

त्यांचं त्यांचं ते बघून घेतील
मदिरेच्या तालावर ते नाचतील, गातील 💃🎤
ही मैफिल ते नाचवत, गाजवत ठेवतील,
मद्याचे प्याले पुन्हा पुन्हा भरतील, रिते करतील. 🍷

पण आज मला फक्त तुझ्याशीच काम आहे
आज मला माझी साकी हवी आहे
जी मला नजरेने पाजेल, ओठांनी पाजेल, 👀
पाजून धुंद करेल, बेहोष करेल, मदहोश करेल.

माझ्या हाती मद्याचा प्याला आहे, 🍷
हा छलकता जाम तुझ्या नावाचा आहे ! 🥂
हा जाम मी उंचावत आहे, पीत आहे,
तुझ्या डोळ्यांना, ओठांना स्मरून मी सेवीत आहे !

माझ्या हाती मद्याचा प्याला आहे, 🍷
हा छलकता जाम तुझ्या नावाचा आहे ! 🥂
घोटाघोटात मला तो अधिक तरुण करीत आहे,
प्रत्येक घोटात मला तुझीच छबी दिसत आहे !  🖼

माझ्या हाती मद्याचा प्याला आहे, 🍷
हा छलकता जाम तुझ्या नावाचा आहे ! 🥂
आज मी शुद्धीत नाहीय, माझं भान हरवलंय,
माझ्या प्रत्येक प्याल्यावर आज तुझंच नाव लिहिलंय.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.03.2023-सोमवार.
=========================================