प्रेम कविता-गीत-स्वप्न माझं खरं झालंय, कुणीतरी माझ्या जीवनात आलंय !

Started by Atul Kaviraje, March 28, 2023, 01:45:13 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, प्रेम कविता-गीत ऐकवितो. "कौन है जो सपनों में आया, कौन है जो दिल में समाया"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा,व मला प्रोत्साहित करा. मार्च महिन्याची ही मंगळवार-दुपार आपणास आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे- (कौन है जो सपनों में आया, कौन है जो दिल में समाया)
----------------------------------------------------------------

               "स्वप्न माझं खरं झालंय, कुणीतरी माझ्या जीवनात आलंय !"
              ---------------------------------------------------

स्वप्न माझं खरं झालंय
कुणीतरी माझ्या जीवनात आलंय ! 👍
ज्याची वाट पाहत होतो आयुष्यभर,
ते सत्यात उतरलंय, समोर उभं ठाकलंय !

स्वप्न माझं खरं झालंय,
कुणीतरी माझ्या जीवनात आलंय ! 👍
माझी प्रार्थना आज फळास आलीय, 🙇
माझ्या प्रियेने माझं मन राखलंय !

स्वप्न माझं खरं झालंय,
कुणीतरी माझ्या जीवनात आलंय ! 👍
आज प्रेमाची खरी किंमत कळलीय,
प्रेम मूर्त रूपात प्रकट झालंय !

माझ्या प्रेमाला आज रंग चढलाय
माझ्या प्रेमाला आज बहार आलीय
आभाळही ते पाहण्यास खाली झुकलंय,
प्रिये, तुझ्या ते ध्यानी आलंय ?

जगाला विसरून बेखबर चाललो होतो 👣
दुनियेला विसरून मी माझ्याच धुंदीत होतो
मंजिल दर मंजिल मी पार करत होतो,
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मी तुला शोधत होतो.

जीवनातले प्रत्येक वळण मी पार करतोय 🏞
जीवनातल्या प्रत्येक वळणावर मी गीत गातोय 🎤
अखेर एका वळणावर तू मला सापडलीस, 🏘
अखेर माझ्या जीवनात तू आलीस.

तू मला मिळालीस, माझं भाग्य उघडलं
तुझं प्रेम मला मिळालं, माझं नशीबच खुललं
तुझं सान्निध्य म्हणजे जणू स्वर्ग, प्रिये,
तुझं असणं म्हणजे जीवन कृतार्थ, प्रिये.

हे अस्मानी सौंदर्य आज माझं झालंय
या स्वर्गीय रूपाने माझं मन मोहलय
सर्व जगाच्या नजरा आज माझ्यावर लागल्यात,
साऱ्यांच्याच नजरेत असूया दिसू लागल्यात.

आपले ऋणानुबंध जन्मोजन्मीचे होते
आपल्याला या जन्मीचं भेटायचे होते
आपल्या दोघांचं शरीर नाही राहणार,
पण आत्म्याला कधीच मरण नाही येणार.

आपलं प्रेम हे सदैव प्रकाशत राहील
आपलं प्रेम हे सदैव उजळत राहील
याची चमक कधीच जाणार नाही,
याचा प्रकाश कधीच कमी होणार नाही.

स्वप्न माझं खरं झालंय
तू माझ्या जीवनात आलीस
स्वप्न माझं सत्यात उतरलंय,
तू आज माझी झालीस.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.03.2023-मंगळवार.
=========================================