२८-मार्च-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, March 28, 2023, 10:45:38 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२८.०३.२०२३-मंगळवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिनविशेष"

                                   "२८-मार्च-दिनविशेष"
                                  --------------------

-: दिनविशेष :-
२८ मार्च
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९९८
'सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स्‌ड कॉम्प्युटिंग' (C-DAC) या संस्थेने विकसित केलेला 'परम-१००००' हा महासंगणक विधिपूर्वक देशाला अर्पण करण्यात आला.
१९९२
उद्योगपती जे. आर. डी. टाटा यांना राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या हस्ते 'भारतरत्‍न' हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.
१९७९
अमेरिकेतील 'थ्री माईल आयलंड' या बेटावर असलेल्या अणूभट्टीतून किरणोत्सारी पदार्थांची गळती झाली.
१९४२
रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे 'इंडियन इंडिपेन्डन्स लीग'ची स्थापना केली.
१९३०
तुर्कस्तानमधील कॉन्स्टँटिनोपाल आणि अंगोरा शहरांची नावे बदलुन अनुक्रमे इस्तंबुल आणि अंकारा अशी करण्यात आली.
१८५४
क्रिमियन युद्ध – फ्रान्सने रशियाविरुद्ध युध पुकारले.
१७३७
बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला.
<[चैत्र शु. ८]
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९६८
नासिर हुसैन – इंग्लिश क्रिकेटपटू, कप्तान व समालोचक
१९२७
विना मझुमदार
आशुतोष कॉलेज मध्ये शिकत असतानाचे छायाचित्र
डॉ. विना मझुमदार – डाव्या विचारसरणीच्या स्त्रीवादी कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ, सेंटर फॉर विमेन्स डेव्हलपमेंट स्टडीज (CWDS) या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा. त्यांचे 'मेमॉयर्स ऑफ अ रोलिंग स्टोन' हे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रसिद्ध आहे.
(मृत्यू: ३० मे २०१३ - नवी दिल्ली)
१९२५
राजा गोसावी – अभिनेता
(मृत्यू: २८ फेब्रुवारी १९९८)
१८६८
मॅक्झिम गॉर्की – रशियन लेखक
(मृत्यू: १८ जून १९३६)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०००
शांताराम द्वारकानाथ तथा राम देशमुख – नामवंत अर्थतज्ज्ञ आणि लेखक
१९९२
आचार्य सम्राट आनंदऋषीजी – स्थानकवासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू
(जन्म: ? ? ????)
१९६९
ड्वाईट आयसेनहॉवर – अमेरिकेचे ३४ वे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: १४ आक्टोबर १८९०)
१९४१
व्हर्जिनिया वूल्फ – ब्रिटिश लेखिका
(जन्म: २५ जानेवारी १८८२)
१५५२
गुरू अंगद देव – शिखांचे दुसरे गुरू
(जन्म: ३१ मार्च १५०४)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.03.2023-मंगळवार.
=========================================