सुंदरतेची दिशा

Started by TEJU KAMBLE, March 29, 2023, 06:21:39 PM

Previous topic - Next topic

TEJU KAMBLE

सुंदरतेची दिशा 

आयुष्यात असेल सुंदरता
तर घडेल का योग्य दिशा ?

चेहऱ्यावर असेल शांतता
तर दिसू लागते का सुंदरता ?

दुसऱ्यांच्या कला गुणांना वाव देताना
होते का कमी सुंदरता ?

दुसऱ्याकडे खूप पैसा आहे तर
आपली होते का कमी सुंदरता ?

व्यक्तीच्या स्वभावाला जपणे
ही नाही का सुंदरता ?

सुंदरतेने वाढले स्वभावातील अहंकार
एकमेकांशी करून स्पर्धा
टिकेल का ही सुंदरता ?

दिले ते आपले स्वीकारून
जपून ठेवता येईल का सुंदरता ?

         तेजू कांबळे-शिंदे