प्रेम-काव्य-कालही होते,आजही आहे, उद्याही असेल, युगानुयुगे आपले हे बंधन अतूट असेल

Started by Atul Kaviraje, March 29, 2023, 10:32:02 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, युगायुगांच्यI प्रेम कहाणीची कविता-गीत ऐकवितो. "सौ साल पहले, मुझे तुमसे प्यार था, आज भी है और कल भी रहेगा"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा,व मला प्रोत्साहित करा. मार्च महिन्याची ही बुधवार-रजनी आपणास आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे- (सौ साल पहले, मुझे तुमसे प्यार था, आज भी है और कल भी रहेगा)
---------------------------------------------------------------------

  "कालही होते, आजही आहे, उद्याही असेल, युगानुयुगे आपले हे बंधन अतूट असेल !"   
-------------------------------------------------------------------------

कालही होते, आजही आहे, उद्याही असेल,
युगानुयुगे आपले हे बंधन अतूट असेल !
जन्मोजन्मीचा हा ऋणानुबंध आपला,
जन्मोजन्मी हा असाच होता, असाच असेल !

कालही होते, आजही आहे, उद्याही असेल,
युगानुयुगे आपले हे बंधन अतूट असेल !
येतील कितीतरी युगे, जातील कितीतरी युगे,
आपले हे प्रेम असेच अमर असेल !

कित्येक सदीया मी तुझ्यासाठी थांबलो होतो
तू पुन्हा भेटण्याची प्रतीक्षा करीत होतो
मन उतावीळ होते, जीवाला हुरहूर होती,
तुला पुन्हा पाहण्याची आस मनी होती. 👀

तू उदास झालीस की मीही उदास होतो 😒
तू नाराज असलीस की मीही नाराज होतो 😒
माझ्यावरचा हा उगा रुसवा सोडून दे, प्रिये,
हसून पहा माझ्याकडे, नजरेत प्रेम दिसू दे, प्रिये. 😊

तुझ्या हास्यात एक जादू आहे 😃
तुझ्या बोलण्यात एक कशिश आहे
तुझा प्रेमळ कटाक्ष मजवरी टाक, प्रिये,  😍
तुला मी केव्हाच मन दिलंय, प्रिये. 💖

तुझ्या या हास्याची मला प्रतीक्षा होती 😃
तुझ्या या प्रेमाची मला कधीपासून ओढ होती
तुझ्या आठवणीत जीव बेकरार होत होता,
तुझ्या आठवणीने मनाची घालमेल सुरु होती.

तुझी ओढ मला काल होती, आजही आहे, उद्याही असेल
तुझ्या आठवणीत मन असंच उदास राहील
मला तुला पुन्हा पुन्हा पाहायचाय, प्रिये,
मला पुन्हा पुन्हा तुझ्यावर प्रेम करायचंय, प्रिये. 

माझ्या मनाच्या तारा तूच तर छेडीत होतीस
माझ्या गाण्याचे सप्तस्वर तूच तर लावीत होतीस 🎼
प्रेम-तराणे, प्रेम-गाणे तूच तर गात होतीस, 🎤
तुझ्या संगीताने तूच तर मला रिझवीत होतीस. 🎧

तुझा हा हसीना जलवा मला पुन्हा पाहायचाय
तुझा या यौवन बहर मला पुन्हा फुलवायचाय 🍀🌺 🌹 🥀🌿🌷🌾
हा बहर कधीच सुकू नये, कधीच मुरझू नये,
वर्षानुवर्षे मला तुला असंच पाहायचाय, ठेवायचंय.

ही माझी कधीपासूनची इच्छा होती, प्रिये
माझं मन कधीपासून हे पाहण्यास इच्छुक होतं
ते कालही होतं, आजही आहे, अन उद्याही असेल,
तुझी ते वर्षानुवर्षे असंच वाट पाहत असेल.

कालही होते, आजही आहे, उद्याही असेल,
युगानुयुगे आपले हे बंधन अतूट असेल !
जन्मोजन्मीचा हा ऋणानुबंध आपला,
जन्मोजन्मी हा असाच होता, असाच असेल !

कालही होते, आजही आहे, उद्याही असेल,
युगानुयुगे आपले हे बंधन अतूट असेल !
येतील कितीतरी युगे, जातील कितीतरी युगे,
आपले हे प्रेम असेच अमर असेल !

कालही होते, आजही आहे, उद्याही असेल,
युगानुयुगे आपले हे बंधन अतूट असेल !
पुन्हा पुन्हा आपण भेटत राहू, प्रिये,
पुन्हा पुन्हा आपण एक होऊ, प्रिये. 🚻

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.03.2023-बुधवार.
=========================================