II श्री राम नवमी II-शुभेच्छा संदेश-1

Started by Atul Kaviraje, March 30, 2023, 11:29:07 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     II श्री राम नवमी II
                                    ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०३.२०२३-गुरुवार आहे. आज "श्री राम नवमी" आहे. चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२:०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी राम-नवमीच्या हार्दिक शुभेच्छा. वाचूया, श्री राम-नवमीचे  शुभेच्छा संदेश.

     रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा – श्रीराम भारतीयांच्या मनामनात असणारे आरध्य दैवत आहेत. भगवान विष्णुचे सहावे अवतार असणाऱ्या श्रीरामांनी, मनुष्याने कश्यापद्धतीने मर्यादाचे पालन करीत जीवन जगायला हवे याची शिकवण दिली आहे. रामनवमी अर्थात श्री राम यांचा जन्म दिवस होय. 2022 साली रामनवमी ही 10 एप्रिल ला साजरी केली जाणार आहे. रामनवमी ला भगवान राम यांचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद आपण प्राप्त करू शकतात.

     आजच्या या लेखात श्री रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश देण्यात आले आहेत. ह्या Ram navami Shubhechha in Marathi आपण व्हाटसअप्प व सोशल मीडिया वर शेअर करू शकतात. ram navami chya hardik shubhechha in marathi आपले मित्र मंडळी व कुटुंबियांसोबत शेअर करून त्यांना श्रे रामनवमी आनंदाने साजरी केली जाऊ शकते. तर चला Ram Navami Wishes in Marathi सुरू करूया...

--राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे धाम आहे
असा हा रघुनंदन आम्हास
सदैव वंदनीय आहे।

--रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा
दशरथ नंदन राम
दया सागर राम
सत्यधर्म पारायण राम
राम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा

--अयोध्या ज्यांचे धाम आहे
राम ज्यांचे नाम आहे
अशा या मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या
चरणी माझा नेहमी प्रणाम आहे..

--ज्यांच्या मनात श्रीराम,
त्यांच्या भाग्यात वैकुंठधाम.
ज्यांनी श्रीरामांना जीवन अर्पित केले आहे,
त्यांचे नेहमी कल्याण झाले आहे.
तुम्हाला व तुमच्या संपूर्ण कुटुंबाला श्री रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा

--राम नवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांनी
दृष्टांचा करण्या सर्वनाश घेतला होता अवतार,
म्हणून आपणही आजच्या या दिवसाला सार्थक बनवूया,
आपल्या आत असणाऱ्या रावणाचा अंत करुया..
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा...!

--विश मराठी टीम
----------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विश मराठी.कॉम)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.03.2023-गुरुवार.
=========================================