II श्री राम नवमी II-शुभेच्छा संदेश-2

Started by Atul Kaviraje, March 30, 2023, 11:30:31 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                    II श्री राम नवमी II
                                   ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०३.२०२३-गुरुवार आहे. आज "श्री राम नवमी" आहे. चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२:०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी राम-नवमीच्या हार्दिक शुभेच्छा. वाचूया, श्री राम-नवमीचे  शुभेच्छा संदेश.

--प्रभुराम तुमच्या जीवनात प्रकाश आणो
तुमच्या जीवनाला सुंदर बनवो,
अज्ञानाचा अंधार दूर करून
श्रीराम तुमच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश आणो..!

--शांती व प्रेमाचा संदेश देणाऱ्या या देशातून
वाईटाला समाप्त करावे लागेल,
आतंकी रावणाचा अंत करण्यासाठी
श्री रामांना यावे लागेल...
रामनवमीच्या च्या हार्दिक शुभेच्छा...
प्रभू श्रीराम तुम्हाला नेहमी आनंदी ठेवो.

--रघुकुल रीत सदा चली आई
प्राण जाए पर वचन न जाई
जय श्री राम 🚩🚩

--आजच्या या शुभ दिवशी
भगवान श्री रामांना प्रार्थना आहे
त्यांची कृपादृष्टी सदैव तुम्हा व तुमच्या कुटुंबावर राहो.

--जे सदमर्गावर चालतात
श्री राम त्यांच्यातच मिळतात.

--श्रीरामांची मर्यादा, माता सीतेचे धैर्य,
लक्ष्मणाचे तेज, हनुमानाची भक्ती
आणि भरताचा त्याग आपणास नेहमी शिकवण देत राहो...
मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा.

--प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो

--संपूर्ण जीवन माझे समर्पित श्री रामांच्या चरणात,
असे श्री राम सदा असतात प्रत्येक भक्ताच्या स्मरणात

--सृष्टीच्या कणाकणात आणि प्रत्येक राम भक्ताच्या मनामनात आहे श्री रामांचे अस्तित्व
जय श्री राम || रामनवमी च्या हार्दिक शुभेच्छा ||

--मर्यादा पुरुषोत्तम श्री राम जगात महान
संपूर्ण कार्य सिद्धी घडवणारे त्यांचे भक्त हनुमान
जय श्री राम

--छोटेसे नाव राम
पण माझ्या हृदयात त्यांचे फार मोठे स्थान
जय जय श्री राम
रामनवमी च्या हार्दिक शुभेच्छा

--विश मराठी टीम
----------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विश मराठी.कॉम)
                    -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.03.2023-गुरुवार.
=========================================