३०-मार्च-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, March 30, 2023, 03:19:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०३.२०२३-गुरुवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                     "३०-मार्च-दिनविशेष"
                                    -------------------

-: दिनविशेष :-
३० मार्च
जागतिक डॉक्टर दिवस
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९४४
दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सोफिया (बल्गेरियाची राजधानी) या शहरावर तुफानी बॉम्बवर्षाव केला.
१९२९
भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली.
१८५६
पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले.
१८४२
अमेरिकन शल्यविशारद डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा प्रथमच वापर केला.
१७२९
थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.
[चैत्र शु. १२]
१६६५
पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडला.
[चैत्र व. ९]
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९४२
वसंत आबाजी डहाके – भाषातज्‍ज्ञ, कोशकार, लेखक आणि कवी
१९०८
देविका राणी – अभिनेत्री
(मृत्यू: ९ मार्च १९९४)
१९०६
जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या – स्वतंत्र भारताच्या भूदलाचे ३ रे सरसेनापती, पद्मभूषण, महावीरचक्र. १९४८ मधे काश्मीरमधील पाकिस्तानी आक्रमकांचा पराभव करणार्‍या भारतीय सैन्याचे ते प्रमुख होते. निवृत्तीनंतर ते संयुक्त राष्ट्रांच्या सायप्रस मधील शांतिसेनेचे प्रमुख म्हणून नियुक्त झाले. तेथील सेवेत असतानाच त्यांना मरण आले.
(मृत्यू: १७ डिसेंबर १९६५)
१८९९
शरदेन्दू बंदोपाध्याय
शरदेन्दू बंदोपाध्याय – बंगाली लेखक. 'ब्योमकेश बक्षी' या गुप्तहेर पात्राचे निर्माते.
(मृत्यू: २२ सप्टेंबर १९७०)
१८९५
निकोलाय बुल्गानिन – सोविएत युनियनचे अध्यक्ष
(मृत्यू: २४ फेब्रुवारी १९७५)
१८५३
व्हिन्सेंट व्हॅन गॉग – डच चित्रकार
(मृत्यू: २९ जुलै १८९०)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००२
आनंद बक्षी – गीतकार
(जन्म: २१ जुलै १९२०)
१९८९
गजानन वासुदेव तथा 'ग. वा.' बेहेरे – 'सोबत' साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक
(जन्म: २४ सप्टेंबर १९२२)
१९७६
रघुवीर मूळगावकर – चित्रकार
(जन्म: १४ नोव्हेंबर १९१८)
१९६९
वासुदेव गोविंद मायदेव – कवी व समाजसेवक
(जन्म: २६ जुलै १८९४)
१९५२
जिग्मे वांगचुक – भूतानचे २ रे राजे
(जन्म: ? ? १९०५)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.03.2023-गुरुवार.
=========================================