खट्याळ प्रेमाची कविता-गीत-आज मला नाचू दे,गाऊ दे,आपल्या प्रेमाला पुन्हा ऊत येऊ दे

Started by Atul Kaviraje, March 30, 2023, 03:45:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, खट्याळ प्रेमाची कविता-गीत ऐकवितो. "उड़े जब-जब जुल्फें तेरी,कंवारियों का दिल मचले"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा,व मला प्रोत्साहित करा. मार्च महिन्याची ही गुरुवार-दुपार आपणास आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे- (उड़े जब-जब जुल्फें तेरी,कंवारियों का दिल मचले)
------------------------------------------------------------

        "आज मला नाचू दे💃, गाऊ दे🎤, आपल्या प्रेमाला पुन्हा ऊत येऊ दे !"
       ---------------------------------------------------------------

आज मला नाचू दे, गाऊ दे, 💃🎤
आपल्या प्रेमाला पुन्हा ऊत येऊ दे !
तू मला तुझ्या प्रेमात अडकवलेस, प्रिया,
तुझ्या प्रेम-पाशात मला घट्ट जखडू दे ! 💑

     आज मला नाचू दे, गाऊ दे, 💃🎤
     आपल्या प्रेमाला पुन्हा ऊत येऊ दे !
     माझ्यावर तुझं खरंच प्रेम आहे का, प्रिये ?
     तुझ्या वागण्या-बोलण्यातून ते दाखवून दे !

तुझ्या घन काळया केसांवर मी मोहित झाले
कपाळावर रुळणाऱ्या बटानी मी आकर्षित झाले
बघ, साऱ्या कुवाऱ्या मुली तुज कश्या पाहताहेत,
माझ्या लाडक्या, तुझं दिल त्या जिंकू पाहताहेत. 💘

तू आहेसच  इतका देखणा, रुबाबदार 👍
तू आहेसच इतका तरुण, तडफदार 👍
की कुणीही तुझ्या प्रेमात पडेल,
तुला पाहता कुणाचही मन मचलेलं. 💖

     तुझ्यासारखे चिकने चेहरे जेव्हा कुणी पाहतील
     तुझ्या रूपाचे जेव्हा कुणी दर्शन करतील
     अगं, घसरुनच पडतील ते, साफ तोंडघशीच पडतील,
     त्यांना आवरता सावरता मग तुलाच त्रास होईल.

     पहा, मौसम प्रेमाचा आलाय प्रिये
     पहा, रसिल्या फळांनी बाग बहरलीय, प्रिये 🍉 🍇 🍓🍒 🍑
     पहा, पिकलेल्या फळांचा सुगंध पसरलाय, प्रिये, 🍏 🍎 🍐 🍊 🍋 🍌
     हा प्रेम-ऋतू आपल्याला साद देत आहे, प्रिये.

किती दिवसात तू इथे नाहीस फिरकलास
जणू काही मला तू विसरूनच गेलास
तुझी वाट पाहता, माझे नयन थकून गेले,
लाडक्या, आता तरी ये, डोळे वाटेकडे लागले. 👀

त्या स्वर्गालाही मग ईर्षा निर्माण होईल
सारं जगही मग असूयेने जळू लागेल
ज्या गावात माझा प्रियकर राहतो,
ज्या गावात माझा लाडका प्रेमी वसतो.   

     किती दिवस तुला पाणवठ्यावर नाही पहिले 🏖
     किती दिवस तुझ्याविना मी असेच काढले
     बघ, काहीतरी बहाणा कर लवकरात लवकर, प्रिये,
     पाणवठाही तुला पाहण्यास उत्सुक आहे, प्रिये. 🏖

     बघ, पौर्णिमेचा पूर्ण-चंद्र उगवलाय 🌝
     छतावर त्याचा मोहक रुपेरी प्रकाश पसरलाय
     मला कुणी साथीला हवंय, माझ्या बरोबर हवंय, 🚻
     अगं गोरी, तुझ्यासवे चंद्र-दर्शनाचा आनंद मला गवसलाय. 🌝

अरे तुला समजतं कसं नाही, खुळ्या
मला गल्लीतील मुलं छेडणार नाहीत का ?
त्या चंद्राला ढगाआड जाऊ दे प्रथम, 💨
मग मला सर्व रस्ता मोकळा असेल नाही का ? 🏞

     सखे, तुझी चाल म्हणजे नागीण सळसळणारी 🐍
     लाडके, तुझे इठलाणे म्हणजे सर्पिण वळवळणारी 🐍
     बघ, मग तुला कुणी सपेरा घेऊन जाईल,
     बघ, तुला कुणीतरी मग गIरुडच घालील.

आज तुला मी शब्द देतेय, साजणा
आज तुला मी वचन देतेय, प्रियकरा
मी कुठेही असेन, मी कुठेही जाईन,
हे माझं दिलं तुझंच असेल, दिलबरा. 💕

आज मला नाचू दे, गाऊ दे, 💃🎤
आपल्या प्रेमाला पुन्हा ऊत येऊ दे !
तू मला तुझ्या प्रेमात अडकवलेस, प्रिया,
तुझ्या प्रेम-पाशात मला घट्ट जखडू दे !

     आज मला नाचू दे, गाऊ दे, 💃🎤
     आपल्या प्रेमाला पुन्हा ऊत येऊ दे !
     माझ्यावर तुझं खरंच प्रेम आहे का, प्रिये ?
     तुझ्या वागण्या-बोलण्यातून ते दाखवून दे !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.03.2023-गुरुवार.
=========================================