गाडीवर आधारित बाल कविता-गीत-चला गाडीतून सफर करूया, मुलांनो या,आपण सारं जग फिरूया

Started by Atul Kaviraje, March 31, 2023, 11:38:08 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, गाडीवर आधारित बाल कविता-गीत ऐकवितो. "चक्के में चक्का चक्के पे गाड़ी गाड़ी में निकली अपनी सवारी"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा,व मला प्रोत्साहित करा. मार्च महिन्याची ही शुक्रवार-सकाळ आपणास आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे- (चक्के में चक्का चक्के पे गाड़ी गाड़ी में निकली अपनी सवारी)
----------------------------------------------------------------------

        "चला गाडीतून 🚘 सफर करूया, मुलांनो या, आपण सारं जग फिरुया !"
       ----------------------------------------------------------------

चला गाडीतून सफर करूया,  🚘
मुलांनो या, आपण सारं जग फिरुया !
छोटे या, मोठे या, सारेजण बसा,
साऱ्या दुनियेला वळसा आपण घालूया !

चला गाडीतून सफर करूया, 🚕
मुलांनो या, आपण सारं जग फिरुया !
माझी गाडी मोठी गुणाची, खूपच देखणी, 🚖
वेगात जाऊया, पॉम पॉम हॉर्न वाजवूया  !

थोडे पाठी बसा, थोडे पुढे बसा
थोडे मध्ये बसा, काही डिक्कीत बसा
माझी गाडी सर्वांनाच पुरेल, 🚔
माझी गाडी सर्वांनाच पुरून उरेल. 🚘

पहा निघाली आपली शाही सवारी
सकाळ असो, असो संध्याकाळ, निघते ती दुपारी
माझ्या गाडीला कुणाची दृष्ट न लागो, 🚘
माझ्या गाडीला कुणा दुष्टाची नजर ना लागो. 🚖

चुन्नु छबिल्या, मुन्नू हठील्या 👶
मखमली टोपीवाला छोटू रंगिल्या 👶
साऱ्यांच्या बसण्यासाठी रांगा लागल्या,
साऱ्यांनी बसण्यासाठी जागा अडवल्या.

लल्लु बटाटा, लल्ली टमाटा
गठील्या शरीराचा कामा गटाटा
लांब दाढीवाला मामा धमाटा,
या साऱ्यांनी, आपण गाडीत करूया धमाका. 🚕

दाटीवाटीने नका बसू, आरामात बसा
भांडू नका, खेळीमेळीने बसा
एकमेकांना जागा द्या, हातात हात घ्या,
गाडीच्या वेगाबरोबर एक सुंदर बाल-गाणे गा. 🎤

सारी मुले लहान आहेत, सारेच सान आहेत 👶
मनाने साधी आहेत, मनाने ती खरी आहेत
त्यांचं आज मी मन राखतोय, त्यांना गाडीने फिरवतोय, 🚔
त्यांच्या खुशीतच मी माझा आनंद मानतोय. 😃😊

पण आहेत अति हुशार, शब्दाला आहेत पक्की
बोलतील तेच करतील, पाहाल तुम्ही हे नक्की
कोणी यांना अनाडी समजू नका, बालिश समजू नका,
साऱ्यांना मी गाडीतून फिरवतोय, घेऊ नका कुणी शंका. 🚖

माझी गाडी वळणे घेतेय, सुसाट धावतेय 🚕 🏞
वाहत्या वाऱ्याशी जणू स्पर्धा करतेय
मुले गाणी गाताहेत गाडीत, आज त्यांना आहे रजा, 🎤 🚘
त्यांच्यासवे मीही लहान होऊन करतोय मजा. 👍

हा सफर खूप लांबचा आहे, दूरचा आहे
हा प्रवास न संपणारा, रस्ता न सरणारI आहे 🏘
माझी गाडी जीवनाचे एक प्रतीकच आहे, 🚖
ही मुले आयुष्याचा हा रस्ता पार करणार आहेत. 🏞

येथे वळणे खूप आहेत, येथे टप्पे अनंत आहेत 🏞
मंजिल खूप लांब आहे, मंजिल अजुनी दूर आहे
पण थकायचे नाही, कंटाळायचे नाही,
ही मुले आताच आनंदाने हे सारे शिकत आहेत. 👍

आता थांबायचे नाही, प्रवास सुरूच ठेवायचा
कितीही येवोत संकटे, गाडीवर ताबा ठेवायचा 🚔
ही मुले खिलाडू वृत्तीची आहेत, जिद्दी आहेत,
हा दूरचा प्रवास करण्याची त्यांची तयारी आहे.

ही मुले थकत नाही, माझी गाडीही थांबत नाही 🚖
मुलांच्या हसण्याबरोबर तीही खिदळत आहे 😃😃
तिचा वेग वाढलाय, मुलांचाही आवाज वाढलाय,
एक जिवंतपणाचा झरा माझ्या गाडीतून वहात आहे. 🚕

चला गाडीतून सफर करूया, 🚘
मुलांनो या, आपण सारं जग फिरुया !
छोटे या, मोठे या, सारेजण बसा,
साऱ्या दुनियेला वळसा आपण घालूया !

चला गाडीतून सफर करूया, 🚘
मुलांनो या, आपण सारं जग फिरुया !
माझी गाडी मोठी गुणाची, खूपच देखणी, 🚖
वेगात जाऊया, पॉम पॉम हॉर्न वाजवूया  !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.03.2023-शुक्रवार.
=========================================