प्रेम कविता-गीत-प्रिये, माझ्या डोळ्यांत पहा निरखून, हृदयातील प्रेमच येईल दिसून !

Started by Atul Kaviraje, March 31, 2023, 10:57:12 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, प्रेम कविता-गीत ऐकवितो. "हम आपकी आँखों में इस दिल को बसा दें तो"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा,व मला प्रोत्साहित करा. मार्च महिन्याची ही शुक्रवार-रात्र आपणास आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे- ( हम आपकी आँखों में इस दिल को बसा दें तो)
---------------------------------------------------------

        "प्रिये, माझ्या डोळ्यांत पहा निरखून, हृदयातील 💘प्रेमच येईल दिसून !"
       --------------------------------------------------------------

प्रिये, माझ्या डोळ्यांत पहा निरखून, 👀
हृदयातील प्रेमच येईल दिसून ! 💘
माझ्या हृदयावर तुझंच नाव कोरलंय,
क्षणोक्षणी तुला जाणवेल ते मनापासून !

प्रिये, माझ्या डोळ्यांत पहा निरखून, 👀
हृदयातील प्रेमच येईल दिसून ! 💘
तुझ्याशिवाय कुणाचीच छबी नाही या नयनांत, 🖼
तुझाच जप करतंय मन राहून राहून !

आता डोळे मिटायलाही मला भीती वाटते
आता डोळे बंद करायलाही मी घाबरतो
न जाणो तुझे चित्र पुसले जाईल डोळ्यांतून, 🖼
तुझी मूर्ती अस्पष्ट होईल माझ्या नयनांतून.   

नाही, माझ्या मनाला मी शिक्षा नाही देऊ शकत 🖐
नाही, मी माझ्या मनाला सजा नाही देऊ शकत 🖐
माझ्याच मनाचा मी अपराधी होईन,
माझ्याच मनाचा मी गुन्हेगार होईन.

तुझा मुक्त केश-संभार वाऱ्यावर लहरतोय
आपसूकच तो मला तुझ्यात गुंतवतोय
तुझ्या कृष्ण-कुंतलात माझा जीव अडकतोय,
तुझ्या गालांवर खेळकर पवन केसांची नक्षी काढतोय.

तुझ्या या रुळणाऱ्या बटा मला मोहित करताहेत
तुझ्या या मुक्त खेळकर बटा मला आकर्षित करताहेत
वाटतंय, प्रेमाची फुले केसांत मIळावीत, 🍀🌺
वाटतंय, मादक सुगंध तना-मनात ती भिनवावीत .

माझं मन थोडं शरारती होतंय
तुझ्या बटांशी खेळावंसं त्याला वाटतंय
तुझ्या बटIनI बोटांनी उडवावंसं वाटतंय,
माळलेल्या फुलांना पुन्हा उधळावंसं वाटतंय. 🍀🌺

मी पुन्हा पुन्हा तुझ्या डोळ्यांत झाकून पाहतोय 👀
मी पुन्हा पुन्हा तुझ्या मनात डोकावून पाहतोय
हळू हळू प्रेमाचा गंध मला तिथे जाणवतोय,
तना-मनात हळू हळू माझ्या तो भिनत राहतोय.

आता तर मी तुझ्या स्वप्नातही येणार
स्वप्नात येऊन तुला मी सतावणार
अगं माझा हक्कच आहे तो,
तुझ्या चेहऱ्यावरचा रुसवा पाहण्यास मला आवडतो. 😒

मी तुझ्या स्वप्नांत वारंवार येणार
तुझ्या डोळ्यांवरची झोप मी उडवणार
माझ्या मनाचे मग समाधान होता,
हळूच तुला थोपटून मी निजवणार. 💤

तुझ्या पायांशी माझा स्वर्गच आहे
तुझ्या पावलांवर मी बेहोष पडण्यास तयार आहे 👣
हा स्वर्ग माझ्या नशिबी नेहमीच यावा,
तुझ्या हाताचा कोमल स्पर्श मज शुद्धीत आणावा.

मी बेहोष होताच तू मला हळूच उठवावे
तुझ्या पदराच्या मुलायम स्पर्शाने माझे अंग पुलकित व्हावे
तुझ्या मधुर भाष्याने माझे भान परत यावे,
तुझ्या कंपित अधराने माझे कपाल वारंवार चुंबावे.

प्रिये, माझ्या डोळ्यांत पहा निरखून, 👀
हृदयातील प्रेमच येईल दिसून ! 💘
माझ्या हृदयावर तुझंच नाव कोरलंय,
क्षणोक्षणी तुला जाणवेल ते मनापासून !

प्रिये, माझ्या डोळ्यांत पहा निरखून, 👀
हृदयातील प्रेमच येईल दिसून ! 💘
तुझ्याशिवाय कुणाचीच छबी नाही या नयनांत,
तुझाच जप करतंय मन राहून राहून !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.03.2023-शुक्रवार.
=========================================