०१-एप्रिल-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, April 01, 2023, 11:29:24 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०१.०४.२०२३-शनिवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                   "०१-एप्रिल-दिनविशेष"
                                  --------------------

-: दिनविशेष :-
०१ एप्रिल
Fool's Day
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००४
'गूगल'ने 'GMail' ही सेवा सुरू केली.
१९९०
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 'भारतरत्‍न'
१९७३
कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये 'प्रोजेक्ट टायगर'ची सुरूवात झाली.
१९५७
भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला. मैल, फर्लांग, फूट, पाऊंड, शेर, आणा यांऐवजी दशमान पद्धतीची परिमाणे वापरात आली. ६४ पैशांचा रुपया जाऊन १०० नव्या पैशांचा रुपया चलनात आला.
१९५५
गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती.
१९३६
ओरिसा राज्याची स्थापना झाली.
१९३५
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) या भारतातील मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली.
१९३३
भारतीय हवाईदलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे औपचारिक उड्डाण
१९२८
पुणे वेधशाळेच्या कामकजास प्रारंभ झाला. यापुर्वी हवामानखात्याचे कामकाज सिमला येथुन चालत असे. त्यामुळे या वेधशाळेला 'सिमला ऑफिस' असेही म्ह्टले जात असे.
१८८७
मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली.
१६६९
उत्तर भारतातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेब याने विशेष फौज तैनात केली.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९४१
अजित वाडेकर – भारताचे क्रिकेट कप्तान, डावखुरे फलंदाज
(मृत्यू: १५ ऑगस्ट २०१८)
१९३६
तरुण गोगोई – केंद्रीय अन्न प्रक्रिया राज्य मंत्री (१९९३ ते १९९५), लोकसभा खासदार (५ वेळा - जोरहाट व कालीबोर मतदारसंघ), आसामचे १३ वे मुख्यमंत्री
[कार्यकाल: १८ मे २००१ ते २४ मे २०१६]
(मृत्यू: २३ नोव्हेंबर २०२०)
१९१२
पण्डित शिवरामबुवा दिवेकर – हिन्दगंधर्व
(मृत्यू: २६ सप्टेंबर १९८८)
१८८९
डॉ. केशव बळीराम हेडगेवार – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष
(मृत्यू: २१ जून १९४०)
१८१५
ऑटो फॉन बिस्मार्क – जर्मनीचा पहिला चॅन्सेलर
(मृत्यू: ३० जुलै १८९८)
१६२१
गुरू तेग बहादूर – शिखांचे नववे गुरू, विविध विषयांवर त्यांनी सुमारे ११६ पदे रचली आहेत.
(मृत्यू: २४ नोव्हेंबर १६७५)
१५७८
विल्यम हार्वी – मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारा इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ
(मृत्यू: ३ जून १६५७)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०१२
एन. के. पी. साळवे – भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष
(जन्म: १८ मार्च १९२१)
२००६
राजा मंगळवेढेकर – बालसाहित्यकार
(जन्म: ११ डिसेंबर १९२५)
२००३
प्रकाश घांग्रेकर – गायक व नट
(जन्म: ? ? ????)
२०००
संजीवनी मराठे – कवयित्री
(जन्म: १४ फेब्रुवारी १९१६)
१९९९
श्रीराम भिकाजी वेलणकर – भारतीय टपालखात्याच्या 'पिन कोड' प्रणालीचे जनक, संस्कृत व पाली भाषेचे गाढे अभ्यासक
(जन्म: ? ? १९१५)
१९८९
श्रीधर महादेव तथा एस. एम. जोशी – समाजवादी, कामगार नेते, पत्रकार, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू
(जन्म: १२ नोव्हेंबर १९०४)
१९८४
पं नारायणराव व्यास – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक
(जन्म: ४ एप्रिल १९०२ - कोल्हापूर, महाराष्ट्र)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.04.2023-शनिवार.
=========================================