प्रेम कविता-प्रिये, तुझ्यात एक अनोखी जादू आहे, तुझी बातच काही और आहे !

Started by Atul Kaviraje, April 01, 2023, 11:26:22 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, प्रियकर-प्रेयसीची प्रेम कविता-गीत ऐकवितो. "छुप गये सारे नज़ारे, ओये क्या बात हो गयी, तूने काजल लगाया, दिन में रात हो गई"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा,व मला प्रोत्साहित करा. एप्रिल महिन्याची ही शनिवार-रात्र आपणास आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे- (छुप गये सारे नज़ारे, ओये क्या बात हो गयी, तूने काजल लगाया, दिन में रात हो गई)
-----------------------------------------------------------------------

           "प्रिये, तुझ्यात एक अनोखी जादू आहे, तुझी बातच काही और आहे !"
          ------------------------------------------------------------

प्रिये, तुझ्यात एक अनोखी जादू आहे,
तुझी बातच काही और आहे !
तू म्हणशील तसंच घडेल, तसंच होईल,
दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस तू करशील ! 🌝 🌚 🌄 🌃

प्रिये, तुझ्यात एक अनोखी जादू आहे,
तुझी बातच काही और आहे !
तुझ्यापुढे झुकतेय सारी दुनिया, सखे,
तुझा व्यक्तिमत्त्वच बघ आगळे आहे !

तू नयन उघडशील, तर दिवस होईल 👀 🌄
तू काजळ लावलंस, तर रात्र होईल 🌃
निसर्गाचे चक्र तू बदलू शकतेस,
जणू भूतलावरली तू देवीचं आहेस. 

     प्रिया, आता बस झाला तुझा बहाणा
     लाडक्या, आता तरी हो तू शहाणा
     गोड गोड बोलून मला मोहीत करतोस,
     मधाळ बोलून मला फशी पाडतोस.

     तू बोलावलंस तरी मी आता नाही येणार
     तू मला नाही ना पुन्हा बोलावणार ?
     बघ, साऱ्या जमान्याला कळलंय हे,
     सर्व लोकांत आपलीच चर्चा चालली आहे.

सखे, उगीचच बहाणा करू नकोस
माझ्याशी बिलकुल प्रतारणा करू नकोस
तुझे ओठ जरी खोटं बोलताहेत,
पण तुझ्या मनात काही वेगळेच आहे.

सखे, तुला आज यायचंच नव्हतं
पण तुझ्या डोळ्यात मी सच्चेपण पाहिलं होतं 👁
शेवटी तू आलीस, माझ्या शब्दाला जागून,
शेवटी तू आलीस, माझ्या प्रेमाला पारखून.

     होय, सख्या मी तुला ओळखायला विसरले
     होय, लाडक्या, मी तुझ्या प्रेमाला नाही पारखले
     बघ, मी आलेय तुला भेटायला,
     सोडून सर्व लोकांना, साऱ्या जमान्याला. 

     आंब्याच्या डहाळीवर बसून कोकिळा गातेय 🕊🎤
     ही काळी कोकिळा गाऊन साऱ्यांना भ्रमिष्ट करतेय
     बहर आल्याचं, मोहोर फुलल्याचं ती सांगतेय, 🌿🌷🌾🌾
     ऋतूने कूस बदलल्याचं ती आपल्या गाण्यातून सूचित करतेय. 🎤

     नंतर ऋतू बदलेल, ढग दाटून येतील 💨
     दाटीवाटी करून ते अमृत-धारा बरसवतील 🌧️
     यापाठी नक्कीच काहीतरी कारण असेल,
     आपल्या दोघांच्या प्रेमाचा तो एक संकेत असेल. 💑

अगं तू खरंच तर बोलतेयस, प्रिये
बघ आभाळात त्या कृष्ण-घटI कश्या दाटून आल्यात
तुझ्या बोलण्यात काही तथ्यच आहे, प्रिये,
थोड्याच वेळात त्या घनघोर वर्षूही लागल्यात. 🌧️

मला मला ऋतू बदलण्यात काही गम्य नाही
मला पाऊस पडण्यात काहीही नवीन नाही
तू फक्त तुझा पदर वाऱ्यावर लहरव, सखे,
बिन-बIदलांचा बघ मुसळधार पाऊस पाडशील, तू लाडके. 🌧️

     आता पुरे झाल्या तुझ्या साऱ्या खोड्या, प्रियकरा
     आता माझा हात सोड, रे रांगड्या प्रियकरा
     मी तुला हात जोडते, मी तुझ्या पाया पडते, 🙏 🙇
     या आकाशी-तारकांच्या साक्षीने मी तुला सांगते. ⭐️ 🌟✨

आज तुझी दोन्ही रूपे मी पाहतोय
आज तुला वेगळ्या स्वरूपात मी पाहतोय
तेव्हा तू माझ्या नजरेस नजर देण्यास संकोचायचीस,
तेव्हा तू माझ्या डोळ्यांना डोळा नाही द्यायचीस.

आज तीच परिस्थती पूर्ण पालटलीय
तेव्हाची माझी प्रिया आज पूर्ण बदललीय
आज तू माझ्यासाठी सारी रात्र जागून काढतेस,
आज तू रात्र रात्रभर माझी वाट पाहतेस.

त्या पावसाची उत्कंठतेने वाट पाहणारी 🌧️
त्या ढगांची आतुरतेने वाट पाहणारी 💨
तू मला एक चकोरीच भासू लागलीस, 🐦
तू माझ्यासाठी आज पूर्णपणे बदललीस.

     माझ्या हातून हे आपसूकच घडतंय, प्रिया
     माझ्या हातून हे कुणी करून घेतंय, प्रिया
     मला कळतं नाहीय हे असं का होतंय ?
     यालाच प्रेम म्हणतात का हे मला सांग, लाडक्या. 💘

     ज्याची भीती होती, आज तेच घडतंय
     मला तुझ्याकडे कुणी ओढून नेतंय
     माझा आज माझ्यावर ताबा नाहीय,
     माझं मन आज आवरतI आवरत नाहीय.

होय, प्रिये हेच तर प्रेम आहे 💝
यालाच तर प्रेम म्हणतात, प्रिये 💟
प्रिये, तुझ्यात एक अनोखी जादू आहे,
तुझी बातच काही और आहे !

प्रिये, तुझ्यात एक अनोखी जादू आहे,
तुझी बातच काही और आहे !
माझं मन धाव घेतंय तुझ्याकडे,
तुझ्यावरच माझा जीव जडला आहे.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.04.2023-शनिवार.
=========================================