श्वास होशील का

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, April 04, 2023, 07:16:51 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

शीर्षक...श्वास होशील का

सांग माझ्या हळव्या सुरांना साद तू देशील का
सांग एकट्या पडलेल्या जीवाचा श्वास होशील का

दोन जीव एकटे कसे पडले
गाऊ लागले का विरह गाणी
नकळत असे काय घडले
हरवून गेल्या काही आठवणी

यातनां माझ्या कुरवाळून मिठीत तू घेशील का
सांग एकट्या पडलेल्या जीवाचा श्वास होशील का

तुझ्या मनाचा माझ्या मनाचा
तूच सांग ना बंध कधी जुळणार
प्रेमाच्या बागेत नव्याने लावलेले
आपल्या नात्याचे रोप कधी फुलणार

आयुष्याची सोबत देऊन नाते किनारी नेशील का
सांग एकट्या पडलेल्या जीवाचा श्वास होशील का

तुझं असं वागणं कळता कळता
आजवर कित्येक कविता झाल्या
किती रुसवे फुगवे पूरवता पूरवता
रात्र साऱ्या तुझ्या आठवणीत गेल्या

रोज कवितेत माझ्या शब्दांची रास मांडशील का
सांग एकट्या पडलेल्या जीवाचा श्वास होशील का

प्रेमाला आपल्या का तडा गेला
काय झाले कसे झाले कळले नाही
खऱ्या प्रेमाचे रेशीम बंध सारे तोडून
तुझं दूर जाणं काळजाला पटले नाही

शेवटच्या क्षणाला तुझ्या स्पर्शाने जागवशील का
सांग एकट्या पडलेल्या जीवाचा श्वास होशील का

कविराज....अमोल....
मो.७८२८८९५५५५...अहमदनगर

असलो काय नसलो काय😢😢😢😢का