महावीर जयंती-चारोळ्या-1

Started by Atul Kaviraje, April 04, 2023, 11:27:56 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "महावीर जयंती"
                                    ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ०४.०४.२०२३-मंगळवार आहे. आज "महावीर जयंती" आहे. भगवान महावीर स्वामींचा जन्म भारतातील कुंडग्राम (बिहार) येथे ख्रिस्तपूर्व ५९९ वर्षांपूर्वी झाला होता. सध्या हे ठिकाण वैशाली (बिहार)चे वासोकुंड मानले जाते. 23 वे तीर्थंकर पार्श्वनाथ जी यांना निर्वाण (मोक्ष) मिळाल्यानंतर 188 वर्षांनी त्यांचा जन्म झाला. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना महावीर जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या पर्वानिमित्त काही चारोळ्या.

=========================================
--अहिंसेचा मार्ग दाखवून
जगाला प्रेमाची शिकवण देणारे
जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर
महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन !

--"अंत:करण स्वच्छ ठेवण्याकरिता
नियमितपणे ईश्वर प्रार्थना केली पाहिजे."
संपूर्ण जगाला असा महान संदेश देणाऱ्या
भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त
कोटी कोटी प्रणाम!

--अहिंसा, दया, क्षमा, शांती,
मैत्रीची शिकवण देणाऱ्या
महावीर स्वामी यांच्या
जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा !!

--"ज्याचे मन निरंतर धर्मरत असते
त्याला देव देखील नमस्कार करतो."
असा महान संदेश देणाऱ्या
भगवान महावीर यांच्या जयंती च्या
हार्दिक शुभेच्छा!!

--सत्य आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या
भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त
सर्व जैन बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा

--"ज्ञानी मनुष्य हा
विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो."
असा महान विचार देणाऱ्या
भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त
त्रिवार वंदन !!
=========================================

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑर्डर.इन)
                       ------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.04.2023-मंगळवार.
=========================================