महावीर जयंती-चारोळ्या-2

Started by Atul Kaviraje, April 04, 2023, 11:29:15 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "महावीर जयंती"
                                     ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ०४.०४.२०२३-मंगळवार आहे. आज "महावीर जयंती" आहे. भगवान महावीर स्वामींचा जन्म भारतातील कुंडग्राम (बिहार) येथे ख्रिस्तपूर्व ५९९ वर्षांपूर्वी झाला होता. सध्या हे ठिकाण वैशाली (बिहार)चे वासोकुंड मानले जाते. 23 वे तीर्थंकर पार्श्वनाथ जी यांना निर्वाण (मोक्ष) मिळाल्यानंतर 188 वर्षांनी त्यांचा जन्म झाला. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना महावीर जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या पर्वानिमित्त काही चारोळ्या.

=========================================
--जगा आणि जगू द्या हा
संदेश देणारे भगवान महावीर
यांच्या स्मृतीस
जयंती निमित्त अभिवादन!

--"दया अशी भाषा आहे कि
ती बहिर्यालाही एकायला येते आणि
मुक्याला देखील समजू शकते."
संपूर्ण जगाला असा महान विचार
देणाऱ्या भगवान महावीर यांच्या जयंतीच्या
मन:पूर्वक शुभेच्छा !!

--अरिहंतांची बोली, सिद्धांचा सारांश
शिक्षकांचा धडा, संतांची संगत
अहिंसेचा प्रचार,
महावीर जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा!

--तुमच्या आत्म्या इतका मोठा
तुमचा कोणताही शत्रू नाही.
वास्तविक शत्रू तुमच्या आत आहे,
तो शत्रू राग,गर्व, लोभ,आणि द्वेष
च्या रुपात आहेत.
महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

--अहिंसा परमो धर्मः
धर्म हिंसा तथैव च:
महावीर जयंती निमित्त
जैन बांधवाना खूप खूप शुभेच्छा !
=========================================

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑर्डर.इन)
                        ------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.04.2023-मंगळवार.
=========================================