महावीर जयंती-शुभेच्छा-1

Started by Atul Kaviraje, April 04, 2023, 11:32:53 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "महावीर जयंती"
                                     ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ०४.०४.२०२३-मंगळवार आहे. आज "महावीर जयंती" आहे. भगवान महावीर स्वामींचा जन्म भारतातील कुंडग्राम (बिहार) येथे ख्रिस्तपूर्व ५९९ वर्षांपूर्वी झाला होता. सध्या हे ठिकाण वैशाली (बिहार)चे वासोकुंड मानले जाते. 23 वे तीर्थंकर पार्श्वनाथ जी यांना निर्वाण (मोक्ष) मिळाल्यानंतर 188 वर्षांनी त्यांचा जन्म झाला. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना महावीर जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या पर्वानिमित्त काही शुभेच्छा.

     लोक महावीर जयंतीच्या दिवशी एकमेकांना महावीर जयंती शुभेच्छा, कोट्स आणि मेसेज पाठवून महावीर जयंतीच्या शुभेच्छा देतात. तुम्हीदेखील महावीर जयंती निमित्त मराठमोळे Messages, Greetings, Whatsapp Status, Facebook Images शेअर करून जैन बांधवांना खास शुभेच्छा देऊ शकता.

     यावर्षी 04 एप्रिल रोजी महावीर जयंती साजरी करण्यात येणार आहे. हा दिवस भगवान महावीरांचा जन्म उत्सव म्हणून साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, भगवान महावीरांचा जन्म चैत्र महिन्याच्या 13 व्या दिवशी झाला होता.

     यावर्षी 04 एप्रिल रोजी महावीर जयंती साजरी करण्यात येणार आहे. हा दिवस भगवान महावीरांचा जन्म उत्सव म्हणून साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, भगवान महावीरांचा जन्म चैत्र महिन्याच्या 13 व्या दिवशी झाला होता. त्यांचा जन्म बिहारमधील कुंडग्राम / कुंडलपूर या राज कुटुंबात झाला होता. त्यांना जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर मानले जाते. तपश्चर्याद्वारे ज्ञान प्राप्त झालेल्या 24 लोकांपैकी महावीर हे एक आहेत. भगवान महावीर यांनी आपल्या इंद्रिय आणि भावनांवर पूर्णपणे विजय मिळविला होता.

               महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !--

=========================================
--संपूर्ण जगाला अहिंसा, दया,

क्षमा, शांती, मैत्री,

जगा आणि जगू द्या हा

संदेश देणारे भगवान महावीर

यांना जयंती निमित्त अभिवादन!

--जगा आणि जगू द्या हा

संदेश देणारे भगवान महावीर

यांच्या स्मृतीस

जयंती निमित्त अभिवादन!

--अरिहंतांची बोली, सिद्धांचा सारांश

शिक्षकांचा धडा, संतांची संगत

अहिंसेचा प्रचार,

महावीर जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा!

--रागावर शांतीने विजय मिळवा,

दुष्टांनवर दयाळूपणाने विजय मिळवा,

आणि असत्यावर सत्यांनी विजय मिळवा!

महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
=========================================

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-टाइम्स नाऊ मराठी.कॉम)
                 ------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.04.2023-मंगळवार.
=========================================