महावीर जयंती-शुभेच्छा-3

Started by Atul Kaviraje, April 04, 2023, 11:36:41 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                    "महावीर जयंती"
                                   ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ०४.०४.२०२३-मंगळवार आहे. आज "महावीर जयंती" आहे. भगवान महावीर स्वामींचा जन्म भारतातील कुंडग्राम (बिहार) येथे ख्रिस्तपूर्व ५९९ वर्षांपूर्वी झाला होता. सध्या हे ठिकाण वैशाली (बिहार)चे वासोकुंड मानले जाते. 23 वे तीर्थंकर पार्श्वनाथ जी यांना निर्वाण (मोक्ष) मिळाल्यानंतर 188 वर्षांनी त्यांचा जन्म झाला. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना महावीर जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या पर्वानिमित्त काही शुभेच्छा.

     भगवान महावीर हे जैन धर्माचे 24 वे तीर्थकर होते. भगवान महावीर यांचा जन्म सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी गणराज्यातील कुंडग्राम येथे आयोध्या इश्र्वाकुवंशी शत्रिय कुटुंबात झाला. वयाच्या तिसाव्या वर्षी महावीर यांनी जगापासून अलिप्त होऊन राज्याच्या वैभवाचा त्याग केला आणि संन्यास घेतला.या काळात महावीर स्वामींचे अनेक अनुयायी तयार झाले.ज्यात त्या काळातील प्रमुख राजे बिंबिसार ,कुनिका आणि चेतक यांचा समावेश होता.

     महावीर जयंती या पोस्टमधे महावीर जयंती शुभेच्छा मराठी,Mahavir Jayanti Wishes In Marathi,Mahavir Jayanti Status In Marathi, Mahavir Jayanti Quotes In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.तुम्हाला हे collection आवडल्यास नक्की share करा.

                      महावीर जयंती शुभेच्छा--

=========================================
आत्म विश्वास हे संरक्षणाचे साधन आहे.

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

अंत:करण स्वच्छ  ठेवण्याकरिता नियमितपणे ईश्वर प्रार्थना केली पाहिजे.

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

क्षमा वृत्ती ठेवून जग जिंकावा.

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

जर तुमच्या मनात शांती नसेल तर तिचा बाहेर शोध घेण्यात काय अर्थ?

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

जिभेचे मौन हे खरे मौन नाही. मनाला मौनाची दीक्षा दिली पाहिजे.

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

जो शक्तीशाली असूनही क्षमा करतो,आणि दरिद्री असूनही दान करतो असे पुरुष स्वर्गाच्याही वर राहत असतात.

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

ज्ञानी मनुष्य हा विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

ज्याचे मन निरंतर धर्मरत असते त्याला देव देखील नमस्कार करतो.

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

दया अशी भाष्या आहे कि ती बहिर्यालाही  एकायला येते आणि मुक्याला देखील समजू शकते.

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

दुष्टांच्या संगतीने सदाचार लोप पावतो

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

--मानसी
--------
🙏...धन्यवाद...🙏

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ओरिजिनल मराठी.कॉम)
                   -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.04.2023-मंगळवार.
=========================================