श्रीगणेश ध्यान....

Started by pomadon, October 01, 2010, 10:19:57 PM

Previous topic - Next topic

pomadon



श्रीगणेश ध्यान
मस्तक :
गणपतीचे मस्तक पाहून आपल्याला तेजबुद्धी आणि नेतृत्वगुणांचं दर्शनही त्यात होतं.

कान :
कानाकडे पाहून असा संकेत मिळतो कि खोट्या, चुकीच्या गोष्टी असल्याला
बाजूला करून सत्याचं श्रवण करावं, चांगलं सार ग्रहण करावं.


सोंड :
सूक्ष्म सुई वा जड दगडही उचलण्याची शक्ती सोंडेमध्ये असते. तशी जाण, शक्ती आपल्यातही असली पाहिजे, हा संकेत त्यातून मिळतो.

दंत :
सुख-दु:ख, मान-अपमान, इ. सारख्या दोन अवस्थांमधून बाहेर पडून त्याच्या पलीकडे जी अवस्था
वा ज्ञान आहे ते जाणून घेण्याचा इशारा या सुळ्यांद्वारे मिळतो . पूर्ण सुळा हा श्रद्धेचा व अर्धा सुळा बुद्धीचा आहे असंही मानलं जातं.

डोळे :
डोळ्यांमधून आपल्याला 'एकाग्रते'चा संकेत मिळतो. तसेच सूक्ष्म दृष्टी ठेवण्याची प्रेरणा मिळते.

उदर :
इतरांच्या चुका पोटात घेऊन त्यांना सहजपणे माफ करण्याचा संदेश मिळतो.

उंदीर :
उंदीर हे लोभ, मोहाचे प्रतिक. लोभ-मोह-इच्छा यांवर जो अंकुश ठेवू शकतो, तोच त्याच्यावर स्वार होऊ शकतो.