जीवन कहाणी कविता-हा बंजारा जीवन-गीत गातोय, सर्वांना जीवन जगण्याचा मार्ग सांगतोय

Started by Atul Kaviraje, April 04, 2023, 02:30:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, जीवन कहाणी कविता-गीत ऐकवितो. "एक बंजारा गाए, जीवन के गीत सुनाए, हम सब जीने वालों को जीने की राह बताए"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा,व मला प्रोत्साहित करा. एप्रिल महिन्याची ही मंगळवार-दुपार आपणास आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे- (एक बंजारा गाए, जीवन के गीत सुनाए, हम सब जीने वालों को जीने की राह बताए)
--------------------------------------------------------------------------

       "हा बंजारा जीवन-गीत गातोय🎤, सर्वांना जीवन जगण्याचा मार्ग सांगतोय !"
      -----------------------------------------------------------------

हा बंजारा जीवन-गीत गातोय, 🎤
सर्वांना जीवन जगण्याचा मार्ग सांगतोय !
आज तो नवीन गाणे घेऊन आलाय, 🎼
आपल्या मधुर वाद्याने तो साऱ्यांना मोहित करतोय ! 🎷 🎺

हा बंजारा जीवन-गीत गातोय, 🎤
सर्वांना जीवन जगण्याचा मार्ग सांगतोय !
त्याचा मधुर तराणा तो सप्तस्वरांत गुंफतोय, 🎼
त्याच्या जादुई आवाजाने तो साऱ्यांना मुग्ध करतोय !

जीवन पुस्तकात तुम्हीं कित्येक दुःखद कथा वाचाल 🔰
आयुष्यात तुम्ही कितीतरी व्यथा, वेदना भोगIल
पण त्यातही तुम्हाला एक सुखांतिका नक्कीच सापडेल,
तो तुम्हाला हा सुखद शेवट शोधण्यास सांगतोय.

आयुष्यात पावला-पावलावर दुःखेच भरलीत 👣
सुखे दूरच, ती नावालाही कधी नाही दिसलीत
तुमच्या चेहऱ्यावर फक्त एक हसू येऊ द्या, 😃
या हास्याने तो तुमचे दुःख विसरावयास लावतोय. 😊

तुमच्या डोळ्यांतले अश्रू तो आपल्या गाण्याने पुसतोय 😢
स्वतः हसून तो तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतोय 😃 😊
हा बंजारा गातोय, अगदी मनापासून गातोय, 🎤
प्रत्येकाला जीवन जगण्याचा जीवन-मंत्र देतोय.

प्रत्येकाचे नशीब असते, भोग भोगावे लागतात
जन्मतःच प्रत्येकजण आपले नशीब घेऊन येतात
नशिबानुसार प्रत्येकाला सुख-दुःख भोगावे लागतात,
प्राक्तन अटळ असते, सर्वजणच यातून जातात.

अशातच हार मानायची नसते, हतबल व्हायचे नसते
कार्य अर्धवट टाकून, हात झटकायचे नसतात
शहाणे, सुज्ञ तेच जे, पानगळीत देखील,
पुन्हा हिरवाईचा बहर फुलवून दाखवतात. 🍀🌺 🌹 🥀🌿🌷🌾🌾

लाथ माराल तिथे पाणी काढा, जिद्दीने नेहमीच कार्य करा
मेहनत, श्रम अंगी बाळगून अथक कष्ट करा
कागदाच्या फुलांनाही सुगंध, सुरभी बहाल करा, 🍀🌺
जीवनात येऊन असे वागा, जीवन सफल करा.

हा बंजारा जीवन-गीत गातोय, 🎤
सर्वांना जीवन जगण्याचा मार्ग सांगतोय !
आज तो नवीन गाणे घेऊन आलाय, 🎼
आपल्या मधुर वाद्याने तो साऱ्यांना मोहित करतोय ! 🎷 🎺

हा बंजारा जीवन-गीत गातोय, 🎤
सर्वांना जीवन जगण्याचा मार्ग सांगतोय !
त्याचा मधुर तराणा तो सप्तस्वरांत गुंफतोय, 🎼
त्याच्या जादुई आवाजाने तो साऱ्यांना मुग्ध करतोय !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.04.2023-मंगळवार.
=========================================