आगळ्या ढंगाची प्रेम कविता-तुझ्या ओठांत मदिरा भरलीय, तुझ्या डोळ्यांत नशाच दिसलीय

Started by Atul Kaviraje, April 05, 2023, 05:25:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, आगळ्या ढंगाची प्रेम कविता-गीत ऐकवितो. "छू लेने दो नाज़ुक होंठों को, कुछ और नहीं हैं जाम हैं ये"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा,व मला प्रोत्साहित करा. एप्रिल महिन्याची ही  सांज-बुधवार आपणास आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे- (छू लेने दो नाज़ुक होंठों को, कुछ और नहीं हैं जाम हैं ये)
-----------------------------------------------------------------

        "तुझ्या ओठांत💋मदिरा🍾भरलीय, तुझ्या डोळ्यांत👀नशाच दिसलीय !"
       ---------------------------------------------------------------

तुझ्या ओठांत मदिरा भरलीय, 💋 🍷
तुझ्या डोळ्यांत नशाच दिसलीय ! 👀
बेहोष करणार सौंदर्य तुझ्यात पाहतोय,
माझ्या बेहोषीची आज परिसीमाच झालीय !

तुझ्या ओठांत मदिरा भरलीय, 💋 🍷
तुझ्या डोळ्यांत नशाच दिसलीय ! 👀
कित्येक दिवस मद्य नाही प्रIशिले मी, 🍷
तुला पाहूनच मी त्याची तहान भागवलीय !

निसर्ग आज तुझ्यावर फिदाच आहे
सढळहस्ते त्याने तुला लावण्य बहाल केले आहे
आम्हाला तुझ्यारूपे तो नजराणाचा बहाल करतोय,
त्याने आम्हा दिलेले हे एक सुंदर बक्षीसच आहे.

आता आणिक लाजू नकोस, प्रिये 🤦‍♂️
शरमेने मान खाली घालू नकोस, सखे 🙇
ही वेळ प्रेमाची आहे, तू प्रेमाची बरसात कर, 💕
तुझ्या नाजूक बोटांनी माझे केस कुरवाळ, प्रिये. 

माझ्या छातीतील धडधड वाढत आहे
माझी तुझ्याबद्दलची उत्सुकता वाढत आहे
माझ्या इच्छा, माझे काही अरमान आहेत,
माझा जीव तुझ्यावरच कुरबान आहे.

आपले प्रेम समाजाला पाहवत नाहीय
भल्या बुऱ्याची समाजाला जाणंच नाहीय
बोटे रोखायला, नावे ठेवायला त्यांना काय जातंय ?
मनातील खरं प्रेम कोण कधी जाणतंय ? 💟

चांगली लोकं तिथे वाईटही असतात, समाजात
चांगले पाहवत नाही, नाव बदनामच करत असतात
आपल्याला त्यांचे काहीच देणे-घेणे नाही, प्रिये,
आपल्या प्रेमात काहीच उणे नाही, प्रिये.

ही मदिरा वाईट गोष्ट असेलही 🍾
ही मदिरा भ्रमिष्ट करीत असेलही 🍾
पण तुझ्या रूपात ती काठोकाठ भरली आहे,
नशा येण्यास पुरेसं असेल एक दर्शनही.

आज मी तुझ्या रूपाच्या नशेत बेहोष होतोय
मला कुणी जागवू नका, आज मी होश खोतोय
मदिरालयात जाणं मी केव्हाचं सोडलंय,
जेव्हापासून तुझं सौंदर्य मी प्राशन करतोय.

तुझ्या ओठांत मदिरा भरलीय, 💋 🍷
तुझ्या डोळ्यांत नशाच दिसलीय ! 👀
बेहोष करणार सौंदर्य तुझ्यात पाहतोय,
माझ्या बेहोषीची आज परिसीमाच झालीय !

तुझ्या ओठांत मदिरा भरलीय, 💋 🍷
तुझ्या डोळ्यांत नशाच दिसलीय ! 👀
कित्येक दिवस मद्य नाही प्रIशिले मी,
तुला पाहूनच मी त्याची तहान भागवलीय !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.04.2023-बुधवार.
=========================================