II श्री हनुमान जयंती II-योगी हनुमान-कविता-2

Started by Atul Kaviraje, April 06, 2023, 01:14:01 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II श्री हनुमान जयंती II
                                  ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०४.२०२३-गुरुवार आहे. आज "हनुमान जयंती" आहे.  हनुमान जयंती म्हणजे हिंदू देवता हनुमान यांचा जन्मदिवस होय. चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून षोडशोपचार पूजेला तसेच कीर्तनाला प्रारंभ करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी हनुमान जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, तर काही कविता.

                                    "योगी हनुमान"
                                   --------------

नाम जपाचा महिमा

हनुमंत दाखवे जना

आत्मज्ञान जाणण्याशी

मानवा सरळ ठेव कना


आत्मबल ते मोठे

सुर्य तो ही येतो मुखात

स्व जागृतीसाठी

लक्ष केंद्रित कर स्वासात


पक्ष्या सारखी झेप

उंच ठेव मनोरथ

मन एकाग्र करून

कर लक्ष्याचे रवंथ


वज्र सारखे शरीर

पेलवून उठेल आव्हाने

आसनांच्या अभ्यासाने

जागतील अंतरी शक्तीस्थाने


स्थुल आणि सुक्ष्म रुप

आहेत तुझ्या मनाचे

ध्यान आणि धारणाने

उघडतील बुद्धीचे दरवाजे


वात कफ पित्त

मानवा हेच तुझे रुप

धरुन योगाला साथीला

बनव शरीराचे सुंदर स्वरुप

--शेषराव येलेकर
---------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
                      -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.04.2023-गुरुवार.
=========================================