II श्री हनुमान जयंती II-शुभेच्छा-1

Started by Atul Kaviraje, April 06, 2023, 01:21:36 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II श्री हनुमान जयंती II
                                  ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०४.२०२३-गुरुवार आहे. आज "हनुमान जयंती" आहे.  हनुमान जयंती म्हणजे हिंदू देवता हनुमान यांचा जन्मदिवस होय. चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून षोडशोपचार पूजेला तसेच कीर्तनाला प्रारंभ करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी हनुमान जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, तर काही शुभेच्छा.

     आज हनुमान जयंती. तुम्हाला हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही जर हनुमान जयंती शायरी मराठी च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच हनुमान जयंती संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून Hindimarathisms.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी हनुमान जयंती शुभेच्छा, हनुमान जयंती शुभेच्छा फोटो आणि हनुमान जयंती स्टेटस मराठी चा संग्रह वाढवत आहोत. आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.

=========================================
--भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात
आनंद, शांती आणि समृद्धी देवो
आणि त्याची कृपादृष्टी
आपल्या परिवारावर कायम राहो..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

--भूत पिशाच निकट नहीं आवे,
महावीर जब नाम सुनावे..
नासे रोग हरे सब पीरा,
जपत निरंतर हनुमत वीरा..
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

--पवनपुत्र, अजंनीसूत,
प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त
मारूती रायाचा विजय असो..
हनुमान जयंतीच्या आपणास
आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

--भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती,
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना,
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे,
सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका...

--ज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे हनुमान,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान,
अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
=========================================

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हिंदी मराठी sms.कॉम)
                  ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.04.2023-गुरुवार.
=========================================