II श्री हनुमान जयंती II-शुभेच्छा-3

Started by Atul Kaviraje, April 06, 2023, 01:24:37 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II श्री हनुमान जयंती II
                                  ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०४.२०२३-गुरुवार आहे. आज "हनुमान जयंती" आहे.  हनुमान जयंती म्हणजे हिंदू देवता हनुमान यांचा जन्मदिवस होय. चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून षोडशोपचार पूजेला तसेच कीर्तनाला प्रारंभ करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी हनुमान जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, तर काही शुभेच्छा.

                 हनुमान जयंती पूजा विधी:--

     हनुमान जयंतीच्या आदल्या रात्री भक्त जमिनीवर झोपतात. झोपेच्या आधी ते भगवान श्रीराम, सीता आणि हनुमानाचे स्मरण करतात. दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठून व्रत आणि उपवास करण्याचा संकल्प धारण करतात. या दिवशी हनुमान जयंतीच्या शोभा यात्रा देखील निघतात. पहाटे पूजा सामग्री सह लोक हनुमानाची पूजा करतात. हनुमान मंत्र, हनुमान चालीसा, सुंदर कांड पाठ इत्यादी भक्तिभावनेने म्हटले जाते.

     जो माणूस भक्ती आणि भावनेने भगवान हनुमानाची उपासना करतो. त्याच्या आयुष्यातील सर्व कष्ट दूर होतात. त्याच्या आयुष्यात आनंद निर्माण होतो.

=========================================
--आया जन्म दिवस राम भक्त हनुमान का,
अंजनीके लाल का, पवन पुत्र हनुमान का,
बोलो सब मिलकर जयकार हनुमान की,
सबको बधाई हो जन्म दिवस हनुमान की..

--ज्ञान, गुण, बळ आणि भक्ती चे दैवत,
श्री हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा..!
माझी प्रार्थना आहे की बजरंगबली
आपले प्रत्येक संकटातून रक्षण करो..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

--भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे
सौख्यकारी दुखहारी दूतवैष्णव गायका...
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!

--अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान..
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!
=========================================

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हिंदी मराठी sms.कॉम)
                  -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.04.2023-गुरुवार.
=========================================