II श्री हनुमान जयंती II-शुभेच्छा-4

Started by Atul Kaviraje, April 06, 2023, 01:26:16 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II श्री हनुमान जयंती II
                                  ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०४.२०२३-गुरुवार आहे. आज "हनुमान जयंती" आहे.  हनुमान जयंती म्हणजे हिंदू देवता हनुमान यांचा जन्मदिवस होय. चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून षोडशोपचार पूजेला तसेच कीर्तनाला प्रारंभ करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी हनुमान जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, तर काही शुभेच्छा.

                हनुमान जयंती बद्दल माहिती--

     भारत हा सणांचा देश आहे. आणि या सणांमुळे हनुमान जयंतीला विशेष असे स्थान आहे. हनुमान जयंती हा रामभक्ताचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात हा उत्सव संपूर्ण उत्साहात साजरा केला जातो. जे लोकहनुमानाला पूजतात त्यांना हनुमान जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्त करतात. भारत हा विविध धर्म, सण, उत्सव यांचा देश आहे. त्यापैकी हनुमान जयंती हा एक खास उत्सव आहे.

                    हनुमान जयंती कधी आहे ?--

     यंदा हनुमान जयंती ०६.०४.२०२३-गुरुवारी आहे. चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी या महापर्वाचे आगमन होते. हा उत्सव देवाधी देव महादेव चंद्रशेखर, मारुत सुत, माता अंजनीचे पुत्र, कष्ट विमोचन हनुमान यांचा अकरावा अवतार केसरी नंदन या रूपात जयंती म्हणून साजरा केला जातो. म्हणून, त्याचे देखील विशेष महत्त्व आहे. यावर्षी हनुमान जयंतीच्या शुभेच्छा सर्वांना पाठवण्यासाठी तुम्ही आमच्या वेब्सितेवर आलात याचा आम्हाला अभिमान वाटतो. आपण या हनुमान जयंतीच्या शुभेच्छा आपल्या मित्रांसह कुटुंबातील सदस्यांसह देखील शेअर करू शकता.

=========================================
--पवनपुत्र, अजंनीसूत,
प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त
मारूती रायाचा विजय असो..
हनुमान जयंतीच्या आपणास
आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

--अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान..
एक मुखाने बोला..
बोला जय जय हनुमान..
हनुमान जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा!!

--भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात
आनंद, शांती आणि समृद्धी देवो
आणि त्याची कृपादृष्टी
आपल्या परिवारावर कायम राहो..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

--ज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे हनुमान,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान,
अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

--पवनतनय संकट हरन,
मंगल मूर्त रूप राम लखन,
सीता सहित, ह्दय बसहु सूर भूप...
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
=========================================

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्मित क्रिएशन.कॉम)
                    --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.04.2023-गुरुवार.
=========================================