अनोखी प्रेम कविता-गीत-मी तयार आहे तुझ्याबरोबर यायला, साजणा, ये तू मला न्यायला !

Started by Atul Kaviraje, April 06, 2023, 10:56:05 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, अनोखी प्रेम कविता-गीत ऐकवितो. "चलो दिलदार चलो चाँद के पार चलो, हम हैं तैयार चलो ओ ओ"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा,व मला प्रोत्साहित करा. एप्रिल महिन्याची ही गुरुवार-रजनी आपणास आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे- (चलो दिलदार चलो चाँद के पार चलो, हम हैं तैयार चलो ओ ओ)
------------------------------------------------------------------------

            "मी तयार आहे तुझ्याबरोबर यायला, साजणा, ये तू मला न्यायला !"
           ----------------------------------------------------------

मी तयार आहे तुझ्याबरोबर यायला, 🚻
साजणा, ये तू मला न्यायला !
तूच माझा हमसफर, तूच माझा राही, 🚻
तुझ्यावाचून हा पथ मोकळाच राही. 🏘

मी तयार आहे तुझ्याबरोबर यायला, 🚻
साजणा, ये तू मला न्यायला !
विश्वास आहे तुजवरी, भरोसा आहे माझा,
हातात हात दिलाय, सांभाळ तोल माझा. 🚻

त्या क्षितिजापल्याड मला घेऊन चल 🌅
त्या आभाळापल्याड मला घेऊन चल
चंद्र चांदण्यांना पार करीत तू, 🌛⭐️ 🌟 ✨
त्या अंतराळात मला घेऊन चल.

त्या आसमंतात मग आपण हरवून जाऊ
त्या चांदण्यांत मग आपण लोप पावू ⭐️ 🌟
आपलं अस्तीत्त्व मग कुठेच नसेल,
सर जगच आपल्याला हरवलेलं असेल.

हे जग सोडून आपण कुठेतरी दूर जाऊ
ही जमीन, ही धरा आपण पाठी ठेवू 
पाहता पाहता त्या वाऱ्यासवे लहरत जाऊ,
या परिसरात हलकेच मिसळून जाऊ.

तुझ्यासवे मला जणू काही नशाच आलीय 🍾
तुझ्याबरोबर असता मला धुंदीच आलीय
सांभाळ मला तू, माझी पावले अडखळत आहेत,
होशच नाही मला, पावलात पावले अडकत आहेत. 👣

तू सवे असता मज निज येतेय 💤
तुझ्या बाहूंचा आधार मी घेऊ पाहतेय
मला घट्ट पकड, तुझ्या मिठीचा सहारा दे, 🤝
मला झोपेतून उठव, सत्यात तुला प्रत्यक्ष पाहू दे.

हे जीवन क्षणभंगुर आहे, याचा काय भरोसा ?
हे जीवन सीमित आहे, उद्याची काय शाश्वती ?
केव्हाच संपेल हे आयुष्य, केव्हाच ते सरेल,
नश्वर हे जीवन, अंती काहीच नुरेल.

आपला हा स्नेह सफर कधीच संपणार नाही
तुझं माझा प्रेम प्रवास कधीच सरणार नाही 💟 🏞
आपले प्रेम अमरच राहील, चिरंतन टिकेल,
त्या ध्रुव ताऱ्यासारखे ते नेहमीच अढळ असेल. 🌟

मी तयार आहे तुझ्याबरोबर यायला, 🚻
साजणा, ये तू मला न्यायला !
तूच माझा हमसफर, तूच माझा राही, 🚻
तुझ्यावाचून हा पथ मोकळाच राही. 🏘

मी तयार आहे तुझ्याबरोबर यायला, 🚻
साजणा, ये तू मला न्यायला !
विश्वास आहे तुजवरी, भरोसा आहे माझा,
हातात हात दिलाय, सांभाळ तोल माझा. 🚻

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.04.2023-गुरुवार.
=========================================