II गूड फ्रायडे II-स्टेटस-2

Started by Atul Kaviraje, April 07, 2023, 11:26:29 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II गूड फ्रायडे II
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.०४.२०२३-शुक्रवार आहे. आज "गूड फ्रायडे" आहे. ईस्टरच्या आधील शुक्रवारी हा सण पाळला जातो. भारतामध्ये गूड फ्रायडे निमित्त बहुतांशी सरकारी व खाजगी कार्यालये व शैक्षणिक संस्थांना सुटी असते. ख्र्सिस्ती धर्मातील समजुतीप्रमाणे या दिवशी येशू ख्रिस्ताला क्रॉसवर चढवण्यात आले. याची आठवण ठेवून ख्रिस्ती जगात हा दिवस शोकदिवस म्हणून मानला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व ख्रिस्ती भाऊ-बहीण कवी-कवयित्रीं यांनी हा दिवस स्मरणात ठेवावा. चला वाचूया, काही गुड फ्रायडे स्टेटस.

     नमस्कार मित्रानो, गुड फ्रायडे हा दिवस ख्रिस्ती धर्मीयांसाठी पवित्र दिवस व दुःखाचा दिवस आहे कारण त्याच्या धार्मिक धारणांनुसार गूड फ्रायडेच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर ठेवले होते. त्यामुळे गुड फ्रायडे हा दिवस सेलिब्रेशनचा नसून मौन बाळगत शोकदिवस म्हणून पाळला जातो. आणि काही जण चर्चमध्ये जाऊन येशूने केलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. या दिवशी लोक शोक व्यक्त करण्यासाठी उपवास करतात

     गुड फ्रायडे या दिवसाला ब्लॅक फ्रायडे, ग्रेट फ्रायडे असेही म्हणतात

     त्या बलिदानच्या दिवसाचं स्मरण करताना त्याने दिलेल्या काही संदेशांची व विचाराची आपण एकमेकांना पाठवून देवाण घेवाण करूया.

=========================================
--येशू ने बलिदान दिले आपल्यासाठी,
गुड फ्रायडे दिवशी आपणास प्रेम आणि शांती लाभो...
गुड फ्रायडे च्या मनापासून शुभेच्छा!

--तुम्हाला दया, शांती आणि प्रेम मिळो . Happy Good Friday.

--तुम्हाला आजच्या या दिवशी दया, क्षमा आणि प्रेम लाभो...Happy Good Friday

--गुड फ्रायडे तुमच्या जीवनात नवी प्रेरणा, नवी आशा आणि नवे चैतन्य घेऊन येवो...Happy Good Friday

--प्रेम आणि क्षमा यांचा संदेश देणारा पवित्र सण म्हणजे गूड फ्रायडे
=========================================

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इस्टार्ट यू पीडिया.कॉम)
                  ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.04.2023-शुक्रवार.
=========================================