०९-एप्रिल-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, April 09, 2023, 10:15:31 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०९.०४.२०२३-रविवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                     "०९-एप्रिल-दिनविशेष"
                                    ---------------------

-: दिनविशेष :-
०९ एप्रिल
जलसंधारण दिन
जागतिक कोंकणी भाषा दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ------------------
१९९५
लता मंगेशकर यांना उत्तर प्रदेशचे राज्यपाल मोतीलाल व्होरा यांच्या हस्ते 'अवधरत्‍न' व 'साहू सूरसम्मान' या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
१९९४
सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव यांना 'आर. डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान
१९६७
बोइंग-७६७ ने पहिले उड्डाण केले.
१९४०
दुसरे महायुद्ध – जर्मनीने नॉर्वे व डेन्मार्क पादाक्रांत केले.
१८६७
रशियाकडून अलास्का हा प्रांत खरेदी करण्याच्या प्रस्तावास अमेरिकेत 'एक' मताने मंजुरी मिळाली.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  --------------------------------
१९४८
जया भादुरी – अभिनेत्री, राज्यसभा खासदार
१९२५
लिंडा गुडमन – अमेरिकन ज्योतिषी व लेखिका
(मृत्यू: २१ आक्टोबर १९९५)
१८९३
राहूल सांकृतायन – इतिहासकार
(मृत्यू: १४ एप्रिल १९६३)
१८८७
दादासाहेब केतकर
विष्णू गंगाधर तथा 'दादासाहेब' केतकर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक
(मृत्यू: १९ आक्टोबर १९५०)
१८२८
गणेश वासुदेव जोशी उर्फ 'सार्वजनिक काका' – समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे व स्वदेशी चळवळीचे प्रणेते आणि पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक
(मृत्यू: २५ जुलै १८८०)
१३३६
शुजा-उद-दिन तैमूर उर्फ तैमूरलंग – मंगोल सरदार
(मृत्यू: १८ फेब्रुवारी १४०५)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    ---------------------------
२००९
शक्ती सामंत – हिन्दी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक व निर्माते
(जन्म: १३ जानेवारी १९२६)
२००९
अशोकजी परांजपे – गीतकार
(जन्म: ? ? ????)
२००१
बेहराम कॉन्ट्रॅक्टर
बेहराम कॉन्ट्रॅक्टर ऊर्फ 'बिझी बी' – पत्रकार व स्तंभलेखक, 'आफ्टरनून डिस्पॅच अँड कुरियर' या सायंदैनिकाचे संपादक
(जन्म: ११ आक्टोबर १९३०)
२००१
शंकरराव खरात
शंकरराव रामचंद्र खरात – दलित साहित्यिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू
(जन्म: ११ जुलै १९२१
१९९८
डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते – महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू
(जन्म: २२ जून १९०८)
१९९४
चंद्र राजेश्वर राव – स्वातंत्र्यसैनिक, तेलंगणाच्या लढ्याचे प्रवर्तक, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस
(जन्म: ? ? १९१४)
१६९५
[वैशाख शु. ६ शके १६१७] पंडितकवी वामनपंडित यांनी भोगाव येथे समाधी घेतली. भर्तृहरीच्या शतकत्रयीचा अनुवाद आणि यथार्थदीपिका ही गीतेवरील टीका हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
(जन्म: ? ? १६०७)
१६२६
सर फ्रँन्सिस बेकन – इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी
(जन्म: २२ जानेवारी १५६१)
१४८३
एडवर्ड (पाचवा)
एडवर्ड (पाचवा) – इंग्लंडचा राजा
(जन्म: २ नोव्हेंबर १४७०)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.04.2023-रविवार.
=========================================