II ईस्टर संडे II-हा दिवस प्रभूचा आहे-कविता-3

Started by Atul Kaviraje, April 09, 2023, 10:35:53 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      II ईस्टर संडे II
                                     ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०९.०४.२०२३-रविवार आहे. आज "इस्टर संडे" आहे. ईस्टर म्हणजेच पुनरुत्थानाचा रविवार हा ख्रिश्चन लोकांचा सण आहे. ख्रिस्ती धर्म मान्यतेनुसार या दिवशी येशू ख्रिस्त मृतातून पुनः उठला, त्याचे पुनरुत्थान झाले. नव्या करारानुसार येशू गुड फ्रायडेच्या दिवशी क्रुसावर मरण पावले व तीन दिवसानी रविवारी पुन्हा जिवंत झाले. या दिवशी ४० दिवसांच्या उपवासाचा (लेन्ट) हा काळ संपतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व ख्रिस्ती भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना इस्टर संडे च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया तर काही कविता.

     Prais the Lord. हा दिवस प्रभूचा आहे, Ha Divas Prabhucha Aahe Lyrics, Sangeeta Saale, best Marathi Christian Song Lyrics

                                  "हा दिवस प्रभूचा आहे"
                                 ---------------------

1.
हा दिवस प्रभूचा आहे
उल्हास व आनंद करू --(2)
किती थोर तो देव
सर्वस्व आपणांस दिले --(2)

तारक तो सामर्थ्य तो
येशू देव युगानयुग आहे --(2)
हा.. हा.. हा.. हा.. हाल्लेलुया
हो.. हो.. हो.. हो.. होसान्ना --(2)
हाल्लेलुया... हाल्लेलुया...हाल्लेलुया --(2)

2.
चला हो आता त्याकडे
महिमा स्तुती वर्णू --(2)
स्वर्गाच्या देवाला
स्तुतीचे गीत गाऊ --(2)
तारक तो सामर्थ्य.....

3.
त्याचा अनुभव घ्या
किती तो चांगला आहे --(2)
सैतानी बंधनातूनी
आपणांस सोडवितो --(2)

तारक तो सामर्थ्य तो
येशू देव युगानयुग आहे --(2)
हा.. हा.. हा.. हा.. हाल्लेलुया
हो.. हो.. हो.. हो.. होसान्ना --(2)
हाल्लेलुया... हाल्लेलुया...हाल्लेलुया --(2)

================================
1-Song-हा दिवस प्रभुचा आहे,Ha Diwas Prabhucha Aahe
2-Singer- Sangeeta Aawle
3-Music- S.P Sunny
4-Lyrics   -
5-Label   -
================================

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-येशू की महिमा.इन) 
                   -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.04.2023-रविवार.
=========================================