१०-एप्रिल-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, April 10, 2023, 08:40:53 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१०.०४.२०२३-सोमवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                   "१०-एप्रिल-दिनविशेष"
                                  ---------------------

-: दिनविशेष :-
१० एप्रिल
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९५५
योहान साल्क या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम पोलिओ लशीची यशस्वी चाचणी केली.
१९१२
इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन बंदरातुन 'टायटॅनिक' जहाजाचे पहिल्या (व शेवटच्या!) सफरीवर प्रयाण.
१८७५
महर्षी स्वामी दयानंद यांनी आर्य समाजाची स्थापना केली.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९३१
किशोरी आमोणकर – शास्त्रीय गायिका
(मृत्यू: ३ एप्रिल २०१७)
१९२७
मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा – भारतीय खगोलशास्त्रज्ञ. तार्‍यांची प्रत आणि त्यांच्या वर्णपटातील परस्परसंबंधांची उकल केली.
(मृत्यू: १० ऑगस्ट १९८२)
१९०७
मोतीराम गजानन तथा मो. ग. रांगणेकर – नाटककार, चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार
(मृत्यू: १ फेब्रुवारी १९९५)
१९०१
डॉ. धनंजय रामचंद्र गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ, भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते, सहकारी चळवळीचे खंदे समर्थक, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु
(मृत्यू: ३ मे १९७१)
१८८०
सर सी. वाय. चिंतामणी – स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार, पहिल्या गोलमेज परिषदेचे विशेष अतिथी, उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री
(मृत्यू: १ जुलै १९४१)
१८९४
घनश्यामदास बिर्ला – व्यापारी पार्श्वभूमीतून पुढे येऊन पुढे प्रचंड औद्योगिक साम्राज्य उभारलेले उद्योगपती
(मृत्यू: ११ जून १९८३)
१८४७
जोसेफ पुलित्झर
जोसेफ पुलित्झर – हंगेरीयन-अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक, वृत्तपत्र क्षेत्रात विशेष कामगिरी बजावणार्‍यांना देण्यात येणार्‍या पुलित्झर पुरस्कारांचे प्रवर्तक
(मृत्यू: २९ आक्टोबर १९११)
१८४३
रामचंद्र भिकाजी गुंजीकर – 'मोचनगड' या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक आणि 'विविध ज्ञानविस्तार' मासिकाचे संपादक
(मृत्यू: १८ जून १९०१)
१७५५
डॉ. सॅम्यूअल हानेमान – होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक
(मृत्यू: २ जुलै १८४३)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०१५
रिची बेनो
रिची बेनो – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व समालोचक
(जन्म: ६ ऑक्टोबर १९३०)
२०००
डॉ. श्रीधर भास्कर तथा 'दादासाहेब' वर्णेकर – संस्कृत पंडित
(जन्म: ३१ जुलै १९१८)
१९९५
मोरारजी देसाई – भारताचे ४ थे पंतप्रधान, स्वातंत्र्यसेनानी व गांधीवादी नेते, 'भारतरत्‍न'
(जन्म: २९ फेब्रुवारी १८९६)
१९६५
डॉ. पंजाबराव देशमुख – स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री, विदर्भात त्यांनी केलेले शिक्षणप्रसाराचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तोडीचे मानले जाते.
(जन्म: २७ डिसेंबर १८९८)
१९४९
बिरबल सहानी – पुरावनस्पती शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष
(जन्म: १४ नोव्हेंबर १८९१ - सहारणपूर, उत्तर प्रदेश)
१९३७
डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर – ज्ञानकोशकार. 'महाराष्ट्रीय ज्ञानकोश' हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे कार्य होय.
(जन्म: २ फेब्रुवारी १८८४ - रायपूर, मध्य प्रदेश)
१९३१
खलील जिब्रान – लेबनॉनमधे जन्मलेले अमेरिकन कवी, लेखक व कलाकार
(जन्म: ६ जानेवारी १८८३)
१८१३
जोसेफ लाग्रांगे – इटालियन गणितज्ञ
(जन्म: २५ जानेवारी १७३६)
१६७८
[चैत्र व. १३ शके १८२०] रामदास स्वामींची 'लाडकी कन्या' वेणाबाई यांचे निधन
(जन्म: ? ? ????)
१३१७
संत गोरा कुंभार समाधिस्थ [चैत्र व. १३ शके १२३९]
(जन्म: ? ? ????)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.04.2023-सोमवार.
=========================================