II बाबासाहेब आंबेडकर जयंती II-डॉ.बाबासाहेब आंबेडकर-पोवाडा-कविता-1

Started by Atul Kaviraje, April 14, 2023, 10:14:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             II बाबासाहेब आंबेडकर जयंती II
                            ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०४.२०२३-शुक्रवार आहे. आज  "बाबासाहेब आंबेडकर जयंती" आहे. बाबासाहेब आंबेडकर जयंती (आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. हा सण दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो. हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रींना बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, काही कविता. 

                             "डॉ.बाबासाहेब आंबेडकर-पोवाडा"
                            -------------------------------

परम पूज्य बाबासाहेब आंबेडकर।

वंदन त्रिवार।देशाचा आधार।

स्वातंत्र्य जगण्याचे मानवाला।

उद्धारिले बहुजनाला । त्याचे मोल बाबासाहेबाला। जी जी जी

मानवाचा क्रांती सूर्य जन्माला।महाराष्ट्राला न्याय मिळाला। गोरगरीबाना कैवारी लाभला। गुलामगिरीच्या सर्व नाशाला।चवदार तळ मुक्त करण्याला । जी जी जी

शरण नाही गेले कुणास । शिक्षणाचे दूध अंगास। देश विकासाचा त्यांचा ध्यास। सोसिला मनुष्यहीन वागणुकीचा त्रास। जातीपातीचा तोड़ूनी फास।सिद्ध केला त्यांनी इतिहास। जी जी जी

असा हा तळपता सूर्य देशात।अज्ञानावर केली मात।मेळ घातला मानवा मानवात।हक्क दिला मानवाचे आयुष्य जगण्यात ।अंधश्रद्धेवर केला आघात। जी जी जी

घटनेचे महान शिल्पकार।संविधान गरीबांचा आधार।

आठवण त्यांची वारंवार।प्रज्ञा, शिल,करुणा यांचा अंगीकार। सत्याला मानूनी आधार।होऊनी संघर्षावर स्वार। जी जी जी

--संजय रघुनाथ सोनावणे
----------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
                     -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.04.2023-शुक्रवार.
=========================================