II बाबासाहेब आंबेडकर जयंती II-निळा सूर्य-कविता-4

Started by Atul Kaviraje, April 14, 2023, 10:20:00 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             II बाबासाहेब आंबेडकर जयंती II
                            ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०४.२०२३-शुक्रवार आहे. आज  "बाबासाहेब आंबेडकर जयंती" आहे. बाबासाहेब आंबेडकर जयंती (आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. हा सण दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो. हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रींना बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, काही कविता. 

                                      "निळा सूर्य"
                                     -----------

या धरतीवर आली कितीतरी , नररत्ने ती जन्माला

परी न भिमासम दुजा , यासम हाच घडला

स्वकर्तुत्वाने अथक प्रयासे , विश्वात चमकला

बुद्धाचा हा निळा धम्म ध्वज आसमंती फडकला ।।१।।


रात्रीचा करुनि दिवस , विद्या व्यासंग जोपासला

परदेशी जाऊन , प्रसंगी एका पावावर राहिला

वकिलीची सनद घेऊनि सूर्य मायदेशी परतला

न्यायासाठी एक होऊनि सभागृही आग ओकला ।।२।।


हाक ऐकुनी दलितांची , चवदार तळ्याचा लढा दिला

तळे अन काळाराम मंदिर, दलितांसाठी खुला केला

नवविचारा नवभाकिता , दलित उद्धारीला

शिक्षणाची ज्योत पेटवून,नेली शिखर वैभवाला ।।३।।


राज्यघटना लिहून भारताचा शिल्पकार मिरवला

भिमाईचा पुत्र हा महान , भारतरत्न गौरविला

एक ध्यास एक आस , बांधवांसाठीच झटला

कोटी कोटी प्रयत्नांनी , राखली ती अस्मिता ।।३।।


भीमाच्या या निळ्या झेंड्याचा, मान आम्ही राखतो

हृदयात ठेवुनी आस तुझी ही , ज्ञान कवेत घेतो

धम्म दीप देई प्रकाश , नित सत्य मार्ग दावितो

महाज्ञानी महामानवाला आम्ही सर्व वंदितो ।।४।।

--सरोज गजरे
------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
                     -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.04.2023-शुक्रवार.
=========================================