II बाबासाहेब आंबेडकर जयंती II-शुभेच्छा-1

Started by Atul Kaviraje, April 14, 2023, 10:23:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              II बाबासाहेब आंबेडकर जयंती II
                             ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०४.२०२३-शुक्रवार आहे. आज  "बाबासाहेब आंबेडकर जयंती" आहे. बाबासाहेब आंबेडकर जयंती (आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. हा सण दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो. हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रींना बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, काही शुभेच्छा. 

     बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते. ते एक प्रख्यात कार्यकर्ते आणि समाजसुधारक होते. डॉ भीमराव आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य दलितांच्या आणि मागासवर्गीयांच्या उत्कर्षासाठी दिले. दलितांचा मशीहा म्हणून ते प्रसिद्ध आहेत. .अश्या या महामानवाची जयंती 14 एप्रिल रोजी संपूर्ण भारतात तसेच जगात मोठ्या उत्सहाने साजरी केली जाते म्हणून आम्ही तुमच्यासाठी भीम जयंती बद्दल काही शुभेच्छा संदेश देत आहोत जे तुम्ही तुमच्या परिवारात share करून एकमेकांना शुभेच्छा देऊ शकता...

              बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा--

=========================================
--नमन त्या पराक्रमाला
नमन त्या देशप्रेमाला
नमन त्या ज्ञान देवतेला
नमन त्या महापुरुषाला
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
|| जय भीम ||

--भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!
|| जय भीम ||

--राजा येतोय संविधानाचा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला...
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा,
|| जय भीम ||

--सजली अवघी पाहण्या तुमची किर्ती
तुम्ही येणार म्हटल्यान
नसानसांत भरली स्फूर्ती
आतुरता फक्त आगमनाची
जयंती माझ्या बाबांची.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा
|| जय भीम ||

--निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे,
घाबरू नको कुणाच्या बापाला
तू भीमाचा वाघ आहे...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा
|| जय भीम ||

--जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,
कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
जय भीम

--मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने,
शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने,
अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,
माझे शत शत नमन चरणी त्यांचे...
अश्या महामानवाच्या हार्दिक शुभेच्छा
जय भीम
=========================================

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी भाऊ.कॉम)
                     ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.04.2023-शुक्रवार.
=========================================