II बाबासाहेब आंबेडकर जयंती II-शुभेच्छा-3

Started by Atul Kaviraje, April 14, 2023, 10:27:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             II बाबासाहेब आंबेडकर जयंती II
                            ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०४.२०२३-शुक्रवार आहे. आज  "बाबासाहेब आंबेडकर जयंती" आहे. बाबासाहेब आंबेडकर जयंती (आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. हा सण दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो. हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रींना बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, काही शुभेच्छा.

     गेल्या दोन वर्षानंतर यंदाची भीम जयंती पहिल्यासारखीच धुमधडाक्यात साजरी करण्यात येणार आहे. भीम जयंतीच्या शुभेच्छा देणारे WhatsApp Messages, Status, Quotes, डॉ. आंबेडकरांचे प्रेरणादायी वाक्य, Facebook Post तुमच्या जवळचे नातेवाईक, मित्रपरिवारमधील लोकांना पाठवून यंदाच्या भीम जयंतीचा आनंद आणखी द्विगुणीत करा.

              बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा--

=========================================
--मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची
तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची
तुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हते
तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे
खरे महामानव होते.
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
|| जय भीम ||

--विश्वरत्न, विश्वभुषण, भारतरन्त, महाविद्वान,
महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,
संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,
परमपूज्य बोधीसत्व, महामानव,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम...
||जय भीम ||

--ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिली
नाहीत,
त्याच व्यक्तीने असे पुस्तक(भारतीय संविधान)
लिहिले की,ज्याने भारत देश चालतोय.
अश्या महामानवाच्या जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा...||

--ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला...
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला
ज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला..
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!
#भीमजयंती

--'मनुस्मृती'
दहन करून
"भारतीय महिलांना"
स्वातंत्र्य देणाऱ्या महामानवास
कोटी-कोटी प्रणाम
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

--माझ्या बाबासाहेबांचं काम एवढे
मोठे
त्यांच्यापुढे वाटतात चंद्र-सुर्य ही छोटे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा
|| जय भीम  ||

--१४ एप्रिल १८९१ ला
सोनियाची उगवली सकाळ
जन्मास आले भीम बाळ.
सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

--कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला,
फक्त बाबासाहेबाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला..
जनावरासारखे होते जीवन,
तो माणूस बनवून गेला..
आम्ही होतो गुलाम,
आम्हाला बादशाह बनवून गेला...
जय भीम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
=========================================

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी भाऊ.कॉम)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.04.2023-शुक्रवार.
=========================================