II बाबासाहेब आंबेडकर जयंती II-शुभेच्छा-5

Started by Atul Kaviraje, April 14, 2023, 10:30:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             II बाबासाहेब आंबेडकर जयंती II
                            ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०४.२०२३-शुक्रवार आहे. आज  "बाबासाहेब आंबेडकर जयंती" आहे. बाबासाहेब आंबेडकर जयंती (आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. हा सण दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो. हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रींना बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, काही शुभेच्छा. 

     सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती राज्यभरात साजरी होतेय. गेल्या दोन वर्षात जगभरात करोना व्हायरसने उच्छाद मांडला आहे. या भयंकर विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊनसारख्या परिस्थितीमुळे सगळ्यात सण-उत्सवांवर विरजण पडले होते. गेल्या दोन वर्षात १४ एप्रिल अर्थात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरच्या घरीच साजरी करण्यात आली होती. दरवर्षी धुमधडाक्यात सार्वजनिक रित्या साजऱ्या होणाऱ्या या वार्षिक आनंदोत्सवावर करोनाचं सावट आलं होतं. मात्र या वर्षी करोनाचं संकट ओसरलं असल्यानं तब्बल दोन वर्षानंतर यंदाची भीम जयंती पहिल्यासारखीच धुमधडाक्यात साजरी करण्यात येणार आहे. असं असलं तरीही करोनाला रोखण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करून यंदाची भीम जयंती सुरक्षितपणे साजरी करूय. तसंच भीम जयंतीच्या शुभेच्छा देणारे WhatsApp Messages, Status, Quotes, डॉ. आंबेडकरांचे प्रेरणादायी वाक्य, Facebook Post तुमच्या जवळचे नातेवाईक, मित्रपरिवारमधील लोकांना पाठवून यंदाच्या भीम जयंतीचा आनंद आणखी द्विगुणीत करा.

         डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा--

=========================================
--दलितांचे ते तलवार होऊन गेले
अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले,
होते ते एक गरीबच,
पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले,
जग खूप रडवीत होता
त्यांना पण ते या जगाला घडवून गेले,
अरे या मूर्खांना अजून कळत कस नाही,
वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा
त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
जय भीम!!!

--हवा वेगाने नव्हती
हवे पेक्षा त्यांचा वेग होता...
अन्याया विरुद्ध लढण्याचा त्यांचा
इरादा नेक होता....!
असा रामजी बाबांचा लेक भीमराव आंबेडकर
लाखात नाही तर जगात एक होता....!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!
जय भीम || जय शिवराय

--जगातला असा एकमेव विद्यार्थी
ज्यांचा शाळेचा पहिला दिवस
'विद्यार्थी दिवस' म्हणून साजरा करतात,
अशा महान "विद्यार्थीची" जयंती आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!
भीमजयंती #जय_भीम

--मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची
तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची
तुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हते
तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे
खरे महामानव होते.
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
|| जय भीम ||

--कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला,
फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला..
जनावरांसारखे होते जीवन,
तो माणूस बनवून गेला..
आम्ही होतो गुलाम,
आम्हाला बादशाह बनवून गेला...
जय भीम....
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
=========================================

--लोकसत्ता ऑनलाइन
--------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लोकसत्ता.कॉम)
                     ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.04.2023-शुक्रवार.
=========================================