II बाबासाहेब आंबेडकर जयंती II-शुभेच्छा-6

Started by Atul Kaviraje, April 14, 2023, 10:31:32 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            II बाबासाहेब आंबेडकर जयंती II
                           ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०४.२०२३-शुक्रवार आहे. आज  "बाबासाहेब आंबेडकर जयंती" आहे. बाबासाहेब आंबेडकर जयंती (आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. हा सण दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो. हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रींना बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, काही शुभेच्छा. 

     जगातला एकमेव व्यक्ती ज्याने रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडवता आपल्या लेखणीच्या बळावर सामाजिक, राजनीतिक,धार्मिक,अशा अनेक प्रकारच्या क्रांती घडवून आणली. अशा महान युगप्रवर्तक क्रांतिकारक,महान अर्थशास्त्रज्ञ,जगात भारताची मान आदराने उंचावणारे विश्वरत्न राष्ट्रनिर्माते, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, महामानव, जगातील आदर्श राज्यघटनाकार,भारतरत्न, ?डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती उत्सवानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा व मानाचा जयभीम..!!?

                  भीम जयंती २०२3 स्टेटस--

=========================================
--होय ,
ज्यांच्या 'Problem of Rupee' या
ग्रंथातून 'भारतीय रिजर्व बँकेची' स्थापना
झाली त्या महान अर्थतज्ञांची जयंती आहे.
?भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.?

--ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके
वाचू दिली नाहीत,
त्याच व्यक्तीने असे पुस्तक(भारतीय संविधान)
लिहिले की,ज्याने भारत देश चालतोय....
?भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.?

--माझ्या बाबासाहेबांचं काम एवढे मोठे
त्यांच्यापुढे वाटतात चंद्र-सुर्य ही छोटे.
?डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.?

--१४ एप्रिल म्हणजे
आमच्या जीवनाची पहाट
१४ एप्रिल म्हणजे मानवतेची लाट
१४ एप्रिल म्हणजे सुखाची भरभराट
१४ एप्रिल म्हणजे समृद्धीची वाट
१४ एप्रिल म्हणजे मनूचा थरथराट
१४ एप्रिल म्हणजे बुदधाशी गाठ
१४ एप्रिल म्हणजे विजयाचा थाट
??डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.??

--काळ कसोटीचाआहे
पण कसोटीला सांगा
वारसा आहे संघर्षाचा...
ही जयंती नाचून
नाही तर वाचून
साजरी करुया..!?

--नमन त्या पराक्रमाला
नमन त्या देशप्रेमाला
नमन त्या ज्ञान देवतेला
नमन त्या महापुरुषाला
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना
?? डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा.??

--एक महान माणूस
प्रतिष्ठित माणसापेक्षा अशा प्रकारे वेगळा
असतो की तो
समाजाचा सेवक होण्यासाठी तयार असतो.
स्वत:ची कुवत विद्यार्थी दशेतच वाढवा.
=========================================

--लोकसत्ता ऑनलाइन
--------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लोकसत्ता.कॉम)
                      ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.04.2023-शुक्रवार.
=========================================