II बाबासाहेब आंबेडकर जयंती II-शुभेच्छा-8

Started by Atul Kaviraje, April 14, 2023, 10:34:31 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                             II बाबासाहेब आंबेडकर जयंती II
                            ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०४.२०२३-शुक्रवार आहे. आज  "बाबासाहेब आंबेडकर जयंती" आहे. बाबासाहेब आंबेडकर जयंती (आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. हा सण दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो. हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रींना बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, काही शुभेच्छा. 

                    भीम जयंती २०२3 स्टेटस--

=========================================
--मी समाजकार्यात,
राजकारणात पडलो
तरी,
आजन्म विद्यार्थीच आहे.

--शंका काढण्यास देखील
ज्ञान लागतं.

--कायदा व सुव्यवस्था हे राजकीय
शरीराचे औषध आहे आणि
जेव्हा राजकीय शरीर आजारी पडते
तेव्हा औषध दिले पाहिजे.

--ह्या जगात स्वाभिमानाने जगायला शिका. आपल्याला काही तरी करून दाखवायचे आहे. अशी महत्त्वाकांक्षा सदैव असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात.

--प्रयत्न यशस्वी होवोत
अथवा अयशस्वी होवोत
कार्याची प्रशंसा होवो अथवा न होवो,
कर्तेव्य केलेच पाहिजे,
जेव्हा मनुष्याची योग्यता व हेतूंचा
प्रामाणिकपणा सिद्ध होतो
तेव्हा त्याचे शत्रू देखील
त्याचा सन्मान करू लागतात.

--शक्तिचा उपयोग वेळ –
काळ पाहून करावा.

--अन्यायाविरूद्ध लढण्याची ताकद
आपल्यात येण्यासाठी आपण
स्वाभिमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे.
=========================================

--लोकसत्ता ऑनलाइन
--------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लोकसत्ता.कॉम)
                     ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.04.2023-शुक्रवार.
=========================================