II बाबासाहेब आंबेडकर जयंती II-शुभेच्छा-9

Started by Atul Kaviraje, April 14, 2023, 10:35:58 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             II बाबासाहेब आंबेडकर जयंती II
                            ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०४.२०२३-शुक्रवार आहे. आज  "बाबासाहेब आंबेडकर जयंती" आहे. बाबासाहेब आंबेडकर जयंती (आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. हा सण दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो. हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रींना बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, काही शुभेच्छा. 

                    भीम जयंती २०२3 स्टेटस--

=========================================
--माणसाला आपल्या दारिद्र्याची
लाज वाटता कामा नव्हे;
लाज वाटायला हवी ती आपल्या
अंगी असलेल्या दुर्गुणांची.
पती-पत्नीमधील नातलगाचे
नाते जवळच्या मित्रांसारखे असले पाहिजे.

--लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे
'हुकूमशाही' आणि
माणसां-माणसांत भेद
मानणारी 'संस्कृती'.

--लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक
किंवा संसदीय सरकार नव्हे.
लोकशाही म्हणजे
सहजीवन राहण्याची पद्धती.

--शिक्षण हे वाघीणीच दूध आहे
आणि जो ते प्राषन करेल तो
वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.

--पाण्याचा एक थेंब ज्या समुद्रामध्ये सामील झाल्याने आपली ओळख गमावते, त्याऐवजी, माणूस ज्या समाजात राहतो त्या समाजातील आपली ओळख गमावत नाही. मानवी जीवन मुक्त आहे. तो केवळ समाजाच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी जन्माला आला आहे.

--मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ दडवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते.
भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्त्वे अमर आहेत
पण बुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही.
कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे.
एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.

--शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.
तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा,
पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.
=========================================

--लोकसत्ता ऑनलाइन
-------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लोकसत्ता.कॉम)
                      ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.04.2023-शुक्रवार.
=========================================