२२-एप्रिल-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, April 22, 2023, 11:16:47 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२२.०४.२०२३-शनिवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                  "२२-एप्रिल-दिनविशेष"
                                 ---------------------

-: दिनविशेष :-
२२ एप्रिल
जागतिक वसुंधरा दिन
मानवाने केलेल्या पर्यावरणाच्या र्‍हासाकडे लक्ष वेधले जावे म्हणून अमेरिकेतील एका गटाने २२ एप्रिल रोजी वसुंधरा दिन साजरा करण्याची प्रथा १९७० मधे सुरू केली. आता जगभर हा दिवस 'जागतिक वसुंधरा दिन' (World Earth Day) म्हणून विविध समारंभ आयोजित करुन साजरा केला जातो.
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००६
प्रमोद महाजन
प्रवीण महाजन यांनी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्यावर कौटुंबिक वादातुन गोळ्या झाडल्या. यानंतर १३ दिवसांनी ५ मे २००६ रोजी त्यांचे निधन झाले. प्रवीण महाजन यांना २००७ मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली.
१९९७
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (NIV) संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील 'ओमप्रकाश भसीन पुरस्कार' जाहीर
१९४८
अरब-इस्त्रायल युद्ध – अरबांनी इस्त्रायलचे हैफा हे प्रमुख बंदर काबीज केले.
१०५६
CrabNebula
क्रॅब नेब्यूलामधील (तेजोमेघ) सुपरनोव्हाचा महास्फोट
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९२९
प्रा. अशोक रामचंद्र केळकर
प्रा. अशोक रामचंद्र केळकर – विख्यात भाषाशास्त्रज्ञ व साहित्य समीक्षक
(मृत्यू: २० सप्टेंबर २०१४)
१९२९
उषा किरण
बादबान (१९५४) या चित्रपटातील दृष्य
उषा मराठे - खेर ऊर्फ 'उषा किरण' – शंभराहून अधिक चित्रपटात व रंगभूमीवर भूमिका साकारलेली अभिनेत्री, मुंबईच्या नगरपाल (Sheriff)
(मृत्यू: ९ मार्च २००० - नाशिक)
१९१६
काननदेवी – अभिनेत्री व गायिका
(मृत्यू: १७ जुलै १९९२)
१९१६
यहुदी मेन्युहीन
यहुदी मेन्युहीन – व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक
(मृत्यू: १२ मार्च १९९९)
१९०४
जे. रॉबर्ट ओपेनहायमर
जे. रॉबर्ट ओपेनहायमर – अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, अणूबॉम्बचे जनक
(मृत्यू: १८ फेब्रुवारी १९६७)
१८८३
अंजनीबाई मालपेकर – भेंडीबाजार घराण्याच्या शास्त्रीय गायिका
(मृत्यू: ७ ऑगस्ट १९७४)
१८७०
व्लादिमीर लेनिन – रशियन क्रांतिकारक
(मृत्यू: २१ जानेवारी १९२४)
१८१२
लॉर्ड (जेम्स अ‍ॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे) डलहौसी – भारताचा गव्हर्नर जनरल (१८४८-१८५६), त्यांनी सार्वजनिक बांधकाम खाते स्थापन करुन सुमारे ३,४०० किमी लांबीचे रस्ते केले. टपाल व तार यांची सेवा सुरू केली. मुंबई ते ठाणे हा लोहमार्ग त्यांच्याच कारकीर्दीत सुरू झाला.
(मृत्यू: १९ डिसेंबर १८६०)
१७२४
एमॅन्युएल कांट – जर्मन तत्त्ववेत्ता
(मृत्यू: १२ फेब्रुवारी १८०४)
१६९८
[वैशाख व. ७, शके १६२०] शिवदिननाथ – नाथपरंपरेतील एका शाखेचे प्रमुख सत्पुरुष
(मृत्यू: ? ? ????)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०२१
श्रवणकुमार राठोड – 'नदीम - श्रवण' या संगीतकार द्वयीतील श्रवण यांचे Covid-19 ने निधन
(जन्म: १३ नोव्हेंबर १९५४)
२०१३
लालगुडी जयरामन
लालगुडी जयरामन – व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक
(जन्म: १७ सप्टेंबर १९३०)
२०१३
जगदीश शरण वर्मा – भारताचे २७ वे सरन्यायाधीश
(जन्म: १८ जानेवारी १९३३)
२००३
बळवंत गार्गी – पंजाबी नाटककार, दिग्दर्शक, कादंबरीकार व लघुकथाकार, पंजाब विद्यापीठातील भारतीय रंगभूमी विभागाचे प्रमुख, 'थिएटर ऑफ इंडिया' आणि 'फोक थिएटर ऑफ इंडिया' या पुस्तकांचे लेखक
(जन्म: ४ डिसेंबर १९१६ - भटिंडा, पंजाब)
१९९४
आचार्य सुशीलमुनी महाराज – थोर विचारवंत, द्रष्टे समाजसुधारक आणि पुरोगामी सेवाव्रती जैन आचार्य
(जन्म: ? ? ????)
१९९४
रिचर्ड निक्सन – अमेरिकेचे ३७ वे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: ९ जानेवारी १९१३)
१९८३
केशवराव कृष्णराव दाते
केशवराव कृष्णराव दाते – हृदयरोगतज्ञ, MRCP (१९४९), FRCP (१९६७), पद्मभूषण (१९६९), १९६० च्या सुमारास भारतात मूळ धरू लागलेल्या हृदयरोगशास्त्राचे (Cardiology) आद्यप्रवर्तक. भारताचे राष्ट्रपती व भारतीय भूदल आणि नौदलाचे शल्यचिकित्सक, ब्रिटिश कार्डिओलॉजिकल सोसायटी आणि कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ बेल्जीयमचे सन्माननीय सदस्य, ऑल इंडिया हार्ट फौंडेशनचे संस्थापक संचालक
(जन्म: ७ ऑगस्ट  १९१२)
१९८०
फ्रिट्झ स्ट्रासमान – जर्मन भौतिकशात्रज्ञ
(जन्म: २२ फेब्रुवारी १९०२)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.04.2023-शनिवार.
=========================================