II अक्षय्य तृतीया II-अक्षय तृतिया-कविता-4

Started by Atul Kaviraje, April 22, 2023, 11:31:54 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II अक्षय्य तृतीया II
                                  ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२२.०४.२०२३-शनिवार आहे. आज "अक्षय्य तृतीया" आहे. वैशाख महिन्यातील तृतीयेला चंदन मिश्रित पाणी व मोदकाच्या दानाने ब्रम्ह तसेच सगळे देवता प्रसन्न होतात. या दिवशी अन्न, वस्त्र, सोने आणि पाण्याचे दIन केल्याने अक्षय फळाची प्राप्ती होते. या दिवशी जे काही दान केले ते अक्षय होते आणि दान देणाऱ्याला सूर्यलोकाची प्राप्ती होते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना अक्षय्य तृतीया च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया तर काही कविता.

                                    "अक्षय तृतिया"
                                   --------------

मं गळावरही आपण स्वारी केली

ग तकाळी विज्ञानाच्या जोरावर

ल लकारी यशाची घुमऊनी

वा जवित डंका शिक्का उमटविला जगतावर..


र डके जीणे टाकून दिले

अ नाहूतपणे विजय मिळवूनी उर्मीवर

क्ष णोक्षणी जपूनी अस्मिता

य शाच्या आपल्या ताकतीवर...


तृ ण लव्हाळ्याचे होऊन कर्तृत्वाने

ति मिरात ही तगलो आपण धैर्याने

या धवल क्रांतीचे स्वागत केले

   हसतमुखाने मोठ्या शौर्याने...


आज अक्षय तृतीया मुहूर्त पहा

  आला नव चैतन्य घेऊन

  चला नवं संकल्प करूया

  देशासाठी थोडे थोडे योगदान देऊन...


डिजिटल क्रांतीचे पाईक होऊ

  हरित क्रांत्तींचे पुन्हा बीज पेरू

  चला पुन्हा या शुभ मुहूर्तावर

  नवं जीवन जोमाने पुन्हा सुरू करू....!

--प्रशांत शिंदे
------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
                       -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.04.2023-शनिवार.
=========================================