II अक्षय्य तृतीया II-अक्षय तृतिया...!-कविता-5

Started by Atul Kaviraje, April 22, 2023, 11:33:27 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II अक्षय्य तृतीया II
                                   ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२२.०४.२०२३-शनिवार आहे. आज "अक्षय्य तृतीया" आहे. वैशाख महिन्यातील तृतीयेला चंदन मिश्रित पाणी व मोदकाच्या दानाने ब्रम्ह तसेच सगळे देवता प्रसन्न होतात. या दिवशी अन्न, वस्त्र, सोने आणि पाण्याचे दIन केल्याने अक्षय फळाची प्राप्ती होते. या दिवशी जे काही दान केले ते अक्षय होते आणि दान देणाऱ्याला सूर्यलोकाची प्राप्ती होते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना अक्षय्य तृतीया च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया तर काही कविता.

                                     "अक्षय तृतिया...!"
                                    -----------------

अक्षय तृतिया...!

आज

अक्षय तृतिया

अक्षय

म्हणजे काय..?

हा मोठा प्रश्न

पण

खर सांगू

अक्षय फक्त

आणि फक्त

प्रेमच...!

मग ते

कोणतही असो...

आईचं

बाबांचं

भावाचं

बहिणीचं

सर्व नात्यांचं

गुरुचं

मित्राचं

आणि

शत्रूचंही..

पण सत्य एकचं

प्रेम प्रेम असतं

आणि

ते अक्षय असतं

अगदी

चिरंजीव

अश्वत्थाम्याच्या

भलभळणाऱ्या जखमेसारखं

किंव्हा

द्रौपदीच्या अक्षय पात्रा सारख.

किंव्हा सदैव

अविरत तेवत राहणाऱ्या

नंदादीपा सरखं...!

--प्रशांत शिंदे
------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
                        -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.04.2023-शनिवार.
=========================================