II अक्षय्य तृतीया II-शुभेच्छा-2

Started by Atul Kaviraje, April 22, 2023, 11:36:27 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II अक्षय्य तृतीया II
                                   ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२२.०४.२०२३-शनिवार आहे. आज "अक्षय्य तृतीया" आहे. वैशाख महिन्यातील तृतीयेला चंदन मिश्रित पाणी व मोदकाच्या दानाने ब्रम्ह तसेच सगळे देवता प्रसन्न होतात. या दिवशी अन्न, वस्त्र, सोने आणि पाण्याचे दIन केल्याने अक्षय फळाची प्राप्ती होते. या दिवशी जे काही दान केले ते अक्षय होते आणि दान देणाऱ्याला सूर्यलोकाची प्राप्ती होते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना अक्षय्य तृतीया च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया तर काही शुभेच्छा.

     अक्षय तृतीया या सणाला आखाजी असेही म्हंटले जाते. तुम्ही जर अक्षय तृतीया SMS च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच अक्षय तृतीया संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून Hindimarathisms.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा, अक्षय तृतीया Wishes चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.

    आज अक्षय तृतीया ! सर्वप्रथम तुम्हा सर्वाना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! हिंदू सणांपैकी अक्षय तृतीया हा एक प्रमुख सण आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाणारी अक्षय तृतीया ही या वर्षी 14 मे ला साजरा केली जाणार आहे. या लेखात आम्ही आपल्यासाठी अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा ( Akshaya Tritiya Wishes in Marathi ) घेऊन आलो आहोत.

अक्षय तृतीया चा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. अक्षय म्हणजे कधीही क्षय ना होणारे, कधीही नष्ट न होणारे. म्हणून या दिवशी जे शुभ कार्य केलं जातं त्याचं फळ हे अक्षय मिळतं. याच कारणामुळे हिंदू धर्मात हा दिवस शुभ मानला जातो. असे म्हटले जाते कि, या दिवशी विष्णू देवाचा सहावा अवतार परशुरामाचा जन्म झाला होता. म्हणून या दिवशी परशुराम जयंतीही साजरी केली जाते. व्यापारी, शेतकरी, गुंतवणूकदार, सोने खरेदी किव्हा कपडे खरेदी तसेच तप व साधना या सगळ्यांसाठी हा दिवस उत्तम आहे. या दिवशी मुद्दाम सोनंही खरेदी केलं जातं कारण ते अक्षय राहतं व लवकर विकण्याची वेळ येत नाही. या दिवशी एकमेकांना अक्षय तृतीया च्या शुभेच्छा दिल्या जातात.

                      अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा--

=========================================
--अक्षय राहो धनसंपदा,
अक्षय राहो शांती..
अक्षय राहो मनामनातील,
प्रेमळ निर्मळ नाती..
अक्षय तृतीयेच्या मनपूर्वक शुभेच्छा..!

--प्रार्थना आहे की आपणास
आणि आपल्या कुटुंबास,
ही अक्षय तृतीया सुख, समृद्धी,
आणि भरभराटीची जावो..
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!

--तुमच्या घरात धनाचा पाऊस येवो,
लक्ष्मीचा सदैव वास राहो..
संकटांचा नाश होवो,
आणि शांतीचा वास राहो..
अक्षय्य तृतीयाच्या मनापासून शुभेच्छा..!

--अक्षय चा अर्थ "कधीही नष्ट न होणारा" असा आहे..
आजच्या या शुभ दिवशी माझी प्रार्थना आहे की,
आपल्या जीवनात प्रेम, सुख, समृद्धी,
उत्साह आणि धनाची कधीही कमतरता न येवो..
अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा !

--तुमच्यासारखी मौल्यवान माणसं,
आमच्याशी नातं जोडून आहेत..
परमेश्वरापाशी मागणं एकच,
आपलं हे सुख अक्षय राहू दे..!

--अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
🌹शुभ सकाळ🌹
आपला दिवस अक्षय आनंदाचा जावो!

--आशा आहे या मंगलदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो.
येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद आणि सुख समाधान घेवून येवोत.
अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा !!
=========================================

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हिंदी मराठी sms.कॉम)
                  ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.04.2023-शनिवार.
=========================================