२४-एप्रिल-दिनविशेष-ब

Started by Atul Kaviraje, April 24, 2023, 11:15:43 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२४.०४.२०२३-सोमवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                   "२४-एप्रिल-दिनविशेष"
                                  ---------------------

क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०११
सत्यनारायण राजू ऊर्फ 'सत्य साईबाबा' – आध्यात्मिक गुरू
(जन्म: २३ नोव्हेंबर १९२६)
१९९९
सुधेन्दू रॉय
सुधेन्दू रॉय – चित्रपट व कला दिग्दर्शक. सुजाता (१९५९), मधुमती (१९५९), बंदिनी (१९६३), मेरे मेहबूब (१९६४), सगीना (१९७५), आप की खातिर (१९७७), स्वीकार, कर्ज (१९८०), सिलसिला (१९८१), कर्मा (१९८६), चांदनी (१९८९), लम्हे (१९९१) इ. चित्रपटांचे कलादिग्दर्शन त्यांनी केले. मधुमती, मेरे मेहबूब आणि सगीना चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. उपहार (१९७१) आणि सौदागर (१९७३) हे त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट आहेत. या दोन्ही चित्रपटांना फॉरेन फिल्म या गटात त्या त्या वर्षीचे ऑस्कर नामांकन मिळाले होते.
(जन्म: ? ? १९२१ - पाबना, पश्चिम बंगाल)
१९९४
शंतनुराव किर्लोस्कर
शंतनुराव किर्लोस्कर – पद्मभुषण पुरस्कार विजेते उद्योगपती, किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ. त्यांचे 'Cactus and Roses' हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
(जन्म: २८ मे १९०३)
१९७४
रामधारी सिंह दिनकर
रामधारी सिंह 'दिनकर' – देशभक्त व हिन्दी साहित्यिक
(जन्म: २३ सप्टेंबर १९०८)
१९७२
जामिनी रॉय
जामिनी रॉय – पद्मभूषण (१९५५) पुरस्कार विजेते चित्रकार, अवनींद्रनाथ टागोर यांचे पट्टशिष्य
(जन्म:  ११ एप्रिल १८८७)
पार्वती आणि गणेश
पार्वती आणि गणेश
१९६०
लक्ष्मण बळवंत भोपटकर
लक्ष्मण बळवंत तथा अण्णासाहेब भोपटकर – नामवंत वकील, महाराष्ट्र मंडळाचे एक संस्थापक, केसरीचे संपादक आणि हिंदू महासभेचे नेते. गांधीहत्या खटल्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वकील म्हणून त्यांनी काम पाहिले.
(जन्म: ? ? १८६०)
१९४२
दीनानाथ मंगेशकर
मास्टर दीनानाथ मंगेशकर – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक व अभिनेते
(जन्म: २९ डिसेंबर १९००)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.04.2023-सोमवार.
=========================================