दिन-विशेष-लेख-जलसंपत्ती दिन-अ

Started by Atul Kaviraje, April 24, 2023, 11:19:29 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "दिन-विशेष-लेख"
                                     "जलसंपत्ती दिन"
                                   -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-24.04.2023-सोमवार आहे, २४ एप्रिल हा दिवस "जलसंपत्ती दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     दरवर्षी 24 एप्रिल हा दिवस 'जागतिक जलसंपत्ती दिन' (World Water Day 2022) म्हणून साजरा केला जातो. जल दिन, जलसंपत्ती दिन या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाकडून पाणी वाचवण्यासाठी आवाहन करण्यात येते. सर्व देशांची सरकारेदेखील त्याबाबत बोलतात.

     गंगा, ब्रह्मपुत्रा यासारख्या पवित्र समजल्या जाणाऱ्या नद्यांतील पाण्याची पातळी किती प्रमाणात कमी होईल, हा चिंतेचा विषय असणार आहे. एक बॅरल पाण्याची किंमत एक बॅरल खनिज तेलापेक्षा अधिक असेल, तो दिवस फार दूर नाही. या संभाव्य धोक्याचा अदमास घेवून आपण धोक्याचा सामना करण्यासाठी आतापासून सिद्ध होण्याची गरज आहे. आज, २४ एप्रिल जलसंपत्ती दिनाच्या निमित्ताने...

     पाण्यामुळे जीवन आहे असे म्हणतात. या देशाची सगळ्यात मोठी संपत्ती जनता आहे. निसर्गाची सगळ्यात मोठी संपत्ती असलेले पाणी या जनतेने एकत्र येऊन जर वाचवलं, तर या देशाचा चेहरामोहरा बदलेल. कारण वेगाने कमी होत असलेले पाण्याचे साठे आणि याचा परिणाम म्हणून पाण्याची वाढती मागणी हा आज देशापुढे गंभीर चिंतेचा विषय झाला आहे. मानवी जीवनात अनादी काळापासून पाण्याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. गंगा, यमुना, नर्मदा, गोदावरी यासारख्या नद्यांप्रती असलेला श्रद्धाभाव लपून राहत नाही. पाण्याचा संग्रह करण्याची व्यवस्थासुद्धा अनादी काळापासून आतापर्यंत महत्त्वाची ठरली आहे. परंतु, ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते आहे, औद्योगिकरणाची वाढ होत आहे. कृषी क्षेत्राचा विस्तार होत आहे. तसेच पाण्यावर आधारित जलऊर्जा प्रकल्पांची निर्मिती होत आहे. त्यामुळे पाण्याची मागणी सतत वाढत आहे. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी निरनिराळे प्रयत्न सुरू असून जलसंधारणात वाढ करण्यात येत आहे. नद्या, विहिरींचे निर्माण कार्य सुरू आहे. पाण्याच्या पुनर्वापराचे प्रयोग होत आहेत. पण, वाढती मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न पुरेसे नाहीत.

     'पंचतत्व मिल बना शरीरा, जल पावक गगन समिरा' म्हणजे भौतिक रूपात आपल्यास जे शरीर प्राप्त झाले आहे. त्या शरीर सृष्टीसाठी पाणी हे महत्त्वाची भूमिका बजावत असते. परंतु, आज हे पाणीच लुप्तप्राय होत आहे. ब्रिटनच तत्त्वज्ञ व इतिहासकार बेंजामिन फ्रँकलीन यांनी १८७६मध्ये लिहिले आहे की 'व्हेन द वेल इज ड्राय, वुई नो द बर्थ ऑफ वॉटर' याचा अर्थ, विहीर जेव्हा कोरड्या पडतात तेव्हा आम्हाला पाण्याला काय मोल आहे हे कळते.

-एल. टी. लवात्रे, नागपूर
---------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
                   ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.04.2023-सोमवार.
=========================================