दिन-विशेष-लेख-जागतिक श्वान दिन

Started by Atul Kaviraje, April 24, 2023, 11:23:12 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "दिन-विशेष-लेख"
                                   "जागतिक श्वान दिन"
                                  -------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-24.04.2023-सोमवार आहे, २४ एप्रिल हा दिवस "जागतिक श्वान दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     कुत्रा (Dog), म्हणजेच श्वान हा तसा जवळचा माणसाचा मित्र. शतकानुशतकांची ही ओळख. आजकाल अनेक प्राणीप्रेमींच्याही गळ्यातला ताईत म्हटले तरीही बहुदा कोणाला आक्षेप असणार नाही. जवळपास अपवाद वगळता सर्वच लोक कुत्रा पाळतात. किंवा त्यांना कुत्र्यांबद्दल सहानभुतीतर असते. पण तुम्हाला माहिती आहे का, कुत्र्याचाही खास दिन साजरा केला जातो. होय, आंतरराष्ट्रीय श्वान दिन (International Dog Day 2022). कदाचित अनेकांना आश्चर्य वाटले असेल. म्हणूनच जाणून घ्या या दिवसाचा इतिहास (Dog Day History & Significance) आणि महत्त्व.

     आंतरराष्ट्रीय कुत्रा दिवस 2004 मध्ये प्राणी कल्याण कार्यकर्ता आणि पाळीव प्राणी जीवनशैली तज्ञ कॉलीन पायगे यांनी पहिल्यांदा साजरा केला. 

     प्राणीमित्र आणि प्राण्यांच्या जीवनशैलीचे अभ्यासक, तज्ज्ञ कॉलीन पायगे यांनी सर्वात प्रथम 'आंतरराष्ट्रीय श्वान दिन' साजरा केला. त्यासाठी त्यांनी हा दिवस निवडला. याच दिवशी त्यांनी 'शेलटी' (Sheltie) नामक कुत्रा स्थानिक प्राणीआश्रमातून दत्तक घेतला होता. त्यावेळी कॉलीन पायगो या केवळ 10 वर्षांच्या होत्या.

     कॉलीन पायगे यांच्या मते, आंतरराष्ट्रीय श्वान दिन हा कुत्र्यांच्या सर्व प्रजाती आणि विविधतेला पाठिंबा देण्यासाठी साजरा केला जातो. नागरिकांना जास्तीत जास्त कुत्रे पाळण्यास प्रवृत्त करणे. मोकाट आणि भटक्या कुत्र्यांची शहरांतील संख्या कमी करणे. तसेच, कुत्र्यांप्रती होणारी अवहेलना सांभाळण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहीत करणे. कुत्र्यांबद्दल मनात राग असणाऱ्यांचे विचार परिवर्तन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

--टीम लेटेस्टली
--------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.लेटेस्टली.कॉम)
                   ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.04.2023-सोमवार.
=========================================