दिन-विशेष-लेख-जागतिक मलेरिया दिवस

Started by Atul Kaviraje, April 25, 2023, 10:54:36 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                                "जागतिक मलेरिया दिवस"
                               ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-25.04.2023-मंगळवार आहे, २५ एप्रिल हा दिवस "जागतिक मलेरिया दिवस" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     मलेरियाचे गांभीर्य लक्षात घेता २५ एप्रिल हा जागतिक मलेरिया दिन म्हणून ओळखला जातो.

     World Malaria Day : जगभरात 25 एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिन (World Malaria Day) साजरा केला जातो. जागतिक मलेरिया दिन हा मलेरिया प्रतिबंध, नियंत्रण आणि या आजाराचे निर्मूलन या गोष्टींबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.  जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 2008 मध्ये सर्वप्रथम हा दिवस साजरा केला. मलेरिया हा आजार Plasmodium Parasites मुळे होतो. जाणून घेऊयात जागतिक मलेरिया दिनाची यंदाची थिम आणि मलेरियाची लक्षण...

                 जागतिक मलेरिया दिन 2022 ची थीम--

     दरवर्षी जागतिक मलेरिया दिनाची थीम वेगळी असते. यावर्षी मलेरिया दिनाची थीम, 'मलेरियाचे प्रमाण कमी करणे आणि लोकांचा जीव वाचवणे' अशी आहे.

     मलेरिया आजार हा डासांमुळे होतो. प्लास्मोडियम व्हायवॅक्स नावाच्या विषाणूमुळे हा आजार होतो. हा विषाणू अॅनोफिलीस हा मादी डास चावल्यानं मानवी शरीरात प्रवेश करतो. त्यानंतर हा बॅक्टेरिया यकृत आणि रक्त पेशींना पसरतात त्यामुळे तो व्यक्ती आजारी पडतो. मलेरिया पसरवणाऱ्या या मादी डासाच्या 5 प्रजाती आहेत.

                  मलेरिया आजाराची लक्षण--

     डास चावल्यानंतर आठ दिवसाने मलेरियाची लक्षण सुरू होतात. ताप येणे, थकवा, स्नायू दुखणे, डोके दुखी, चक्कर येणे ही मलेरियाची लक्षण आहेत.  यामधील कोणतीही लक्षण जर तुम्हाला जाणवली तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध घेऊ शकतात.

     मच्छरदानीचा वापर केल्यानं मलेरिया होणार नाही. तसेच घराच्या आजूबाजूला पाणी साठू देऊ नका.

--एबीपी माझा वेब टीम
प्रियांका कुलकर्णी
--------------------

                (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.ए.बी.पी.लाईव्ह.कॉम)
               ---------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.04.2023-मंगळवार.
=========================================