२९-एप्रिल-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, April 29, 2023, 10:33:20 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२९.०४.२०२३-शनिवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                "२९-एप्रिल-दिनविशेष"
                               ---------------------

-: दिनविशेष :-
२९ एप्रिल
आंतरराष्ट्रीय नृत्यकला दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९९१
बांगलादेशच्या दक्षिण भागातील चितगाव जिल्ह्यात आलेल्या एका भीषण चक्रीवादळाने सुमारे १,३८,००० लोकांचा बळी घेतला तर सुमारे १ कोटि लोक बेघर झाले.
१९४५
दुसरे महायुद्ध – इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली.
१९३३
'प्रभात'चा 'सिंहगड' हा चित्रपट प्रदर्शित झाला.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९७०
आंद्रे आगासी – अमेरिकन लॉनटेनिस खेळाडू
१९६६
फिल टफनेल – इंग्लिश फिरकी गोलंदाज
१९३६
झुबिन मेहता – भारतीय संगीतकार
१९०१
मिचेनोमिया हिरोहितो – दुसर्‍या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट
(मृत्यू: ७ जानेवारी १९८९)
१८६७
डॉ. शंकर आबाजी भिसे – भारताचे 'एडिसन'
(मृत्यू: ७ एप्रिल १९३५)
१८४८
राजा रविवर्मा – चित्रकार
(मृत्यू: २ आक्टोबर १९०६)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०२०
इरफान खान
(२०१५)
इरफान खान – भारतीय, ब्रिटिश तसेच अमेरिकन चित्रपटांत भूमिका साकारलेले अभिनेते, पद्मश्री (२०११) पुरस्काराने सन्मानित
(जन्म: ७ जानेवारी १९६७)
२००६
जे. के. गालब्रेथ
जॉन केनेथ तथा जे. के. गालब्रेथ – कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि मुत्सद्दी, भारतातील अमेरिकेचे ७ वे राजदूत
(जन्म: १५ आक्टोबर १९०८)
१९८०
श्रीकृष्ण के. क्षीरसागर – लेखक, विचारवंत, समीक्षक
(जन्म: ६ नोव्हेंबर १९०१)
१९८०
सर अल्फ्रेड हिचकॉक – चित्रपट दिग्दर्शक
(जन्म: १३ ऑगस्ट १८९९)
१९६०
पं. बाळकृष्ण शर्मा ऊर्फ 'नवीन' – हिन्दी कवी. हिन्दीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्‍न केले.
(जन्म: ८ डिसेंबर १८९७)
१९४५
हाइनरिक हिमलर
हाइनरिक हिमलर – जर्मन नाझी अधिकारी
(जन्म: ७ आक्टोबर १९००)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.04.2023-शनिवार.
=========================================