दिन-विशेष-लेख-आंतरराष्ट्रीय नृत्यकला दिन

Started by Atul Kaviraje, April 29, 2023, 10:35:52 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                              "आंतरराष्ट्रीय नृत्यकला दिन"
                             -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-29.04.2023-शनिवार आहे, २९ एप्रिल हा दिवस "आंतरराष्ट्रीय नृत्यकला दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस कधी असतो ?
💃 *आज आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस; जाणून घ्या महत्व*

💁‍♂ दरवर्षी 29 एप्रिल हा दिवस आंतराराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो. बॅले नृत्याचे आद्य संस्थापक जीन-जॉर्जेस नोव्हेर (इ.स.1727-1810) यांचा हा जन्मदिवस. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो.

📍 युनेस्कोची एक सह संघटना असलेली आयटीआय म्हणजेच आंतरराष्ट्रीय थिएटर संस्था यांच आयोजन करतं. ही संस्था 1982 पासून हा दिवस साजरा करते.

🎯 *दिवसाचे महत्व:* जगभरात नृत्यकला साजरी करणे, नृत्यकलेने राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धर्माच्या विविधतेच्या सीमा ओलांडून सर्वाना 'नृत्या'च्या द्वारे एकत्र आणणे, आणि नृत्यकलेचे समाजातले स्थान उंचावणे हा मुख्य उद्देश या दिवसामागे आहे.

💫 *भारतीय नृत्यशैली:* नृत्य ही एक 64 कलांपैकी असलेली कला आहे. दोनशेहून अधिक लोकनृत्ये ही भारतात प्रचलित आहेत. दहा शास्त्रीय नृत्यशैली भारतात रुजलेल्या आहेत यातील कथक, मणिपुरी, भरतनाट्यम् आणि कथकली या प्रमुख शास्त्रीय नृत्य पद्धती आहेत.

🧐 *भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार:*

▪ *महाराष्ट्र* - लावणी, कोळी नृत्य
▪ *तामिळनाडू* - भरतनाट्यम
▪ *केरळ* - कथकली
▪ *आंध्र प्रदेश* - कुचीपुडी, कोल्लतम
▪ *पंजाब* - भांगडा, गिद्धा
▪ *गुजरात* - गरबा, रास
▪ *ओरिसा* - ओडिसी
▪ *जम्मू आणी काश्मीर* - रौफ
▪ *आसाम* - बिहू, जुमर नाच
▪ *उत्तरखंड* - गर्वाली
▪ *मध्य प्रदेश* - कर्मा, चार्कुला
▪ *मेघालय* - लाहो
▪ *कर्नाटक* - यक्षगान, हत्तारी
▪ *मिझोरम* - खान्तुंम
▪ *गोवा* - मंडो
▪ *मणिपूर* - मणिपुरी
▪ *अरुणाचल प्रदेश* - बार्दो छम
▪ *झारखंड* - कर्मा
▪ *छत्तीसगढ* - पंथी
▪ *राजस्थान* - घूमर
▪ *पश्चिम बंगाल* - गंभीरा
▪ *उत्तर प्रदेश* - कथक

💃 _*जगभरात नृत्य संस्था रुजवणारे !*_

📍 _जगभरात 29 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय नृत्य दिन' म्हणून साजरा केला जातो. बॅले मास्टर जीन-जॉर्जेस नोव्हेर (इ.स.1727-1810) यांचा हा जन्मदिवस आहे. त्यांच्या हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर नृत्याला समर्पित केला जातो. त्यांचा आज स्मृतिदिन असून स्मृतिदिनानिमित्त बातमीदारचे त्यांना अभिवादन._

💁🏻‍♂ _*काही रंजक गोष्टी*_

◾युनेस्कोची एक सह संघटना असलेली आयटीआय म्हणजेच आंतरराष्ट्रीय थिएटर संस्था यांच आयोजन करते. ही संस्था 1982 पासून हा दिवस साजरा करते.

◾सर्वोत्कृष्ट नर्तकाची निवड आयटीआयची आतंरराष्ट्रीय नृत्य समिती करते.

◾नृत्यकलेने राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धर्माच्या विविधतेच्या सीमा ओलांडून सर्वाना 'नृत्या'च्या द्वारे एकत्र आणणे, आणि नृत्यकलेचे समाजातले स्थान उंचावणे हा मुख्य उद्देश या दिवसामागे आहे.

◾भरतनाटय़म, कथक, ओडिसी, बॅले, बेलीडान्स, कन्टेम्पररी डान्स, सालसा काबुकी, फ्लेमेंको हे नृत्याचे प्रकार आहेत.

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-उत्तर.को)
                     -----------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.04.2023-शनिवार.
=========================================