महाराष्ट्र दिन-महाराष्ट्र दिन-कविता-कविता-2

Started by Atul Kaviraje, May 01, 2023, 04:29:42 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "महाराष्ट्र दिन"
                                     --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक ०१.०५.२०२३-सोमवार आहे. आज "महाराष्ट्र दिन" आहे. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो  मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना महाराष्ट्र दिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया काही कविता.

                                   "महाराष्ट्र दिन-कविता"
                                  ---------------------

महाराष्ट्र असे सुंदर आमुचा

जन्म झाला या मातीत

याहून अधिक भाग्यथोर

काय हवे या मायभूमीत


वृक्षवल्ली,नद्या,डोंगर

निसर्ग पसरला चौफ़ेर

इथेच साकारले सत्यस्वप्न

जगातील वास्तू या भूवर


क्रांतीकारक,शाहिर,जन्मले

या महाराष्ट्राच्या भूमीत

त्यांच्या क्रांती विचाराने

केला महाराष्ट्र जागृत


संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम

शिवबा,शाहू ,फुले, आंबेडकर 

सावित्रीमाई,फातिमा,कर्मवीर भाऊराव पाटील

कार्य त्यांचे पसरले जगभर


सर्व समाधान इथे मिळे

नाही कशाची कमी आम्हांला

गोरगरीब ऐक्याने जगतो

आदर्श महाराष्ट्राचा जगाला 


संयुक्त लढा महाराष्ट्राचा

प्रेरणा असे महाराष्ट्राला

एक मे दिन साजरा करून

सलाम शहिदांच्या कार्याला

--संजय रघुनाथ सोनावणे
----------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
                       -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.05.2023-सोमवार. 
=========================================